Moeen Ali Run Out By Suyash Prabhudessai
Moeen Ali Run Out By Suyash Prabhudessai Sakal
IPL

VIDEO : पदार्पणात सुयशची चपळाई; मोईन अलीनं गोंधळून फेकली विकेट

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर सामना रंगला आहे. या सामन्यात रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेच्या धमाकेदार खेळीनं सर्वांच लक्ष वेधलं. या जोडीनं संघाला ट्रॅकवर आणण्यापूर्वी युवा आणि आरसीबीकडून पदार्पण करणाऱ्या सुयश प्रभुदेसाई (Suyash Prabhudessai) देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

सुयश याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवून देत चेन्नईचा अष्टपैलू मोईन अलीला तंबूचा रस्ता दाखवला. या रन आउटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. एका बाजूला सुयश प्रभुदेसाईच कौतुक होत असताना नेटकरी अनुभवी मोईन अली (Moeen Ali) याला ट्रोल करत आहेत.

चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोईन अलीनं बॅकवर्ड पाँइंटच्या दिशेने चेंडू मारला. त्यानंतर त्याने चोरटी धाव घण्याचा प्रयत्न केला. सुयशनं चपळाई दाखवत जलद थ्रो करुन मोईन अलीला रन आउट केले. सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि मोईन अली यांच्यातील ताळमेळ गडबडला आणि त्याचा आरसीबीला फायदा झाला. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अनुभवी आणि मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या मोईन अलीला बाद केल्यानंतर सुयशचं सेलिब्रेशनही बघण्याजोगे होते.

मोईन अली तुला काय वाटलं? अशा प्रश्नार्थक स्वरुपात एका नेटकऱ्याने पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या खेळाडूला किरकोळ समजलेस का? अशा शब्दांत मोईन अलीला ट्रोल केलं आहे. याशिवाय अन्य काही नेटकऱ्यांना रन आउटचा कॉल हा अलीचा होता. आणि ती त्याची मोठी चूक होती असेही म्हटलं आहे. क्षेत्ररक्षणाचा अदभूत नमुना दाखवून देणाऱ्या सुयशचं काँमेंट्री बॉक्सनंतर आणि सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT