IPL 2022 RR vs RCB
IPL 2022 RR vs RCB Sakal
IPL

IPL 2022 : युजी-देवदत्तवर 'धर्मसंकट'; जाफरला आठवलं 'महाभारत'

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 RR vs RCB: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेतील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात कुणाचे बारा वाजणार याची चर्चा सुरु असताना भारताचा माजी क्रिकेटर वासीम जाफरने (Wasim Jaffer) केलेले मीम चर्चेत आले आहे. याआधी आरसीबीच्या (RCB) ताफ्यातून खेळलेला युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal ) ही जोडी या सामन्यात बंगळुरुच्या विरोधात मैदानात उतरणार आहे.

चहल आणि पडिक्कल यांच्यासाठी हा सामना खूपच भावनिक असेल. हा धागा पकडत जाफरने महाभारत सीरियलमधील एक मीम शेअर करत या दोघांची अवस्था काय असेल हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जाफरने महाभारत मालिकेतील एक मीम शेयर केलीये. यात कुरक्षेत्रमधील कौरव-पांडव यांच्यातील युद्धात अर्जुन भीष्म पितामह यांच्यावर बाणावर बाण मारताना दिसते. यावेळी अर्जुनाच्या चेहऱ्यावर भाव हे दुखी असल्याचे दिसते. अशीच काहीशी अवस्था राजस्थानकडून खेळणाऱ्या चहल आणि पडिक्कल यांची बंगळुरुविरुद्धच्या सामन्यावेळी असेल, असे जाफरला वाटते.

जाफरने लावलेल्या तर्कानुसार चहलने जर आरसीबी विरुद्ध विकेट्स घेतल्या आणि पडिक्कलनेधावा केल्या तर या दोन्ही खेळाडूंसाठी हा एक भावूक क्षण असेल. रॉयल चॅलेंजर्सने यंदाच्या मेगा लिलावाआधी या दोघांना रिलीज केले होते. ही दोघही आरसीबीसाठी प्रमुख खेळाडू राहिली होती. त्यामुळे मेगा लिलावात बंगळुरुचा संघ त्यांना पुन्हा संघात घेईल, असे वाटत होते. पण राजस्थान संघाने यांना आपल्या ताफ्यात सामील करुन घेत संघ मजबूत केला.

राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करतान दिसत आहे. त्यांनी दोन पैकी दोन्ही सामन्यातील विजयासह चार गुण मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुन दोन पैकी एक सामना जिंकला असून एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात राजस्थानचे पारडे जड असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT