ohit Sharma Reaction After Tim Seifert bowled
ohit Sharma Reaction After Tim Seifert bowled ESAKAL
IPL

VIDEO : सैफर्ट बोल्ड होताच रोहितने दिली खतरनाक रिअ‍ॅक्शन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने फेव्हरेट मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) चार विकेट्सनी पराभव केला. दिल्लीने मुंबईचे 178 धावांचे आव्हान 6 फलंदाजांच्या बदल्यात पार करून हंगामाची विजयाने सुरूवात केली. मुंबई जरी या सामन्यात हरली असली तरी मुंबईकडून मुर्गन अश्विन, बेसल थंम्पी आणि इशान किशन यांनी चांगली कामगिरी केली. दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या गोलंदाजाचे यश सेलिब्रेट करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सचे 178 धावांचे आव्हान पार करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि टीम सैफेट यांनी दमदार सुरूवात देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 3 षटकात 30 धावा केल्या असताना मुंबईच्या अश्विन मॉर्गनने 21 धावांवर खेळणाऱ्या सैफेटचा एका अत्कृष्ट गुगलीवर त्रिफळा उडवला. या विकेटनंतर रोहित शर्माने जोरदार सेलिब्रेशन केले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे.

मुंबईने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) समोर 178 धावांचे चांगले आव्हान ठेवले होते. त्यानंतर दिल्लीची अवस्था 6 बाद 104 अशी केली होती. मात्र जयंत यादवने (Jayant Yadav) 38 चेंडूत 48 धावांची खेळी केली. त्याला डावखुऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) 17 चेंडूत 38 धावा चोपून मोलाची साथ दिली. या दोघांनी दिल्लीला पराभवाच्या दाढेतून खेचून काढले आणि 19 व्या षटकातच विजयी मुकूट चढवला. मुंबईला गोलंदाजी करताना जयंत यादवने तर फलंदाजी करताना कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) चांगलेच सतावले. कुलदीपने रोहित, पोलार्डसह मुंबईच्या तीन फलंदाजांची शिकार केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT