ipl 2022 winner prize money 
IPL

IPL 2022 जिंकणाऱ्या संघाला किती रक्कम मिळणार?

आयपीएल 2022 मध्ये कोणत्या क्रमांकाच्या संघला किती रक्कम मिळणार.

Kiran Mahanavar

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. दरवर्षी क्रिकेट जगतातील सर्वात दिग्गज खेळाडू आयपीएल खेळायला येतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर करोडो रुपये खर्च केले जातात. पण आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? आयपीएल 2022 मध्ये कोणत्या क्रमांकाच्या संघाला किती रक्कम मिळणार.(IPL 2022 Winner Prize Money)

आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. जगभरात खेळल्या जाणार्‍या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये हे रक्कम सर्वाधिक आहे. अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातील, गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती. IPL 2022 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांना 7-7 कोटी रुपये देखील दिले जातील.

एवढी बक्षीस रक्कम जगभरात खेळल्या जाणार्‍या कोणत्याही वेगवेगळ्या T20 लीगमध्ये दिली जात नाही. आयपीएल नंतर कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 7.5 कोटी रुपये दिले जातात. दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीग पेक्षा बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये अधिक बक्षीस रक्कम दिली जाते. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये 6.34 कोटी रुपये आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये 3.73 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम आहे.

आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात 2008 मध्ये फायनल जिंकणाऱ्या संघाला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही बक्षीस रक्कम आता जवळपास चौपट वाढली आहे. गतवर्षी जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपये देण्यात आले होते, यंदाही ही बक्षीस रक्कम तशीच ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

Horoscope Astrology : 'या' 3 राशींचे लोक खूप वर्षे जगतात, उतार वयात मिळतं सगळं सुख..पाहा यात तुमची रास आहे का?

SCROLL FOR NEXT