Ben Stokes IPL 2023 
IPL

IPL 2023: आयपीएल संपली अन् हा खेळाडू झाला तंदुरुस्त! फ्रँचायझीला लावला 16.25 करोडोंचा चुना

आयपीएल 2023 मध्ये या खेळाडूवर फ्रँचायझींनी करोडो रुपये खर्च केले पण....

Kiran Mahanavar

Ben Stokes IPL 2023 : दोन महिन्यांच्या रोमांचक सामन्यानंतर आयपीएल 2023 आता संपली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग संपताच पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा उत्साह वाढला आहे. जिथे टीम इंडिया 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाला अॅशेसपूर्वी आयर्लंडचा सामना करावा लागणार आहे.

यादरम्यान इंग्लंडच्या एका मोठ्या खेळाडूच्या फिटनेसबाबत अपडेट समोर आले आहे. आयपीएलच्या जवळपास संपूर्ण हंगामात बेंचवर बसलेला हा महागडा खेळाडू त्याच्या संघासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती मिळाली आहे. इंग्लंडचा संघ लॉर्ड्सवर 1 जून ते 4 जून दरम्यान आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळणार आहे.

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आयपीएल 2023 च्या चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. फ्रँचायझीने त्याला तब्बल 16.25 कोटींना खरेदी केले. मात्र दोनच सामने खेळल्यानंतर त्याला दुखापत झाली. त्यानंतर संपूर्ण हंगाम तो बेंचवर बसला.

CSK प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर तो आपल्या देशात परतला. पण आता आलेले अपडेट जाणून सीएसकेचे चाहते नक्कीच नाराज होऊ शकतात. म्हणजेच आयपीएल संपून अवघे ३ दिवस झाले आहेत आणि हा खेळाडू त्याच्या संघ इंग्लंडकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. यावरून फ्रँचायझीला 16.25 कोटींचा मोठा तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आगामी अॅशेस मालिकेत अष्टपैलू म्हणून खेळणार आहे, म्हणजेच तो गोलंदाजीसाठीही तंदुरुस्त आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा हा खेळाडू दुखापतीमुळे केवळ दोनच सामने खेळू शकला. यादरम्यान त्याने एकच षटक टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : ‘जी राम जी’वर लोकसभेची मोहोर ; रोजगारवाढीचा केंद्र सरकारचा दावा

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT