IPL 2023 Rinku Singh 
IPL

KKRच्या प्लेऑफच्या आशा जिवंत! शेवटच्या चेंडूवर चौकार अन् रिंकू सिंगने हिसकावला पंजाब किंग्जकडून विजय

Kiran Mahanavar

IPL 2023 Rinku Singh : आयपीएल 2023 च्या 53 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा पराभव केला. शेवटच्या चेंडूवर चौकार मारत रिंकू सिंगने पंजाब किंग्जकडून विजय हिसकावला, नितीश राणाच्या कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा पाच विकेट्सने पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने शेवटच्या चेंडूवर पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सचे 11 सामन्यांत 10 गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर पंजाब 11 सामन्यांत 10 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

या सामन्यात पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याचवेळी वरुण चक्रवर्तीने तीन आणि हर्षित राणाने दोन गडी बाद केले. कोलकाता नाईट रायडर्सकडून नितीश राणाने 51 आणि आंद्रे रसेलने 42 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहरने दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, कर्णधार शिखर धवनच्या खेळीच्या जोरावर पंजाब संघाने आव्हानात्मक धावसंख्या गाठली. पुन्हा एकदा प्रभसिमरन सिंगची बॅट चालली नाही आणि तो 12 धावांवर बाद झाला. धवन एका टोकाला राहिला, पण दुसऱ्या टोकाला त्याला साथ मिळू शकली नाही. भानुका राजपक्षे यांना खातेही उघडता आले नाही.

लियाम लिव्हिंगस्टन 15, जितेश शर्मा 21, सॅम करन केवळ 4 धावा करू शकले. मात्र, शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रारच्या झंझावाती फलंदाजीमुळे पंजाबने 20 षटकांत 179 धावांपर्यंत मजल मारली. शाहरुख 8 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला आणि ब्रारने 9 चेंडूत 17 धावा केल्या.

फिरकी गोलंदाजांनी कोलकात्यासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी घेतले. हर्षित राणाला दोन बळी मिळाले. सुयश शर्मा आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Delhi Tragedy : ‘तू ड्रामा करता है...’ असे म्हणत शिक्षकांनी छळलं!, अवघ्या १५ वर्षीय शौर्यला सरांनीच टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त केलं; चिठ्ठीतून उलगडा

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर

Headache Relief: औषधांशिवाय डोकेदुखीवर मिळवा आराम ! घरच्या घरी आजच करा 'हे' 9 सोपे उपाय

IND vs SA, 2nd Test : भारत पुन्हा टॉस हरला; दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; गिलच्या जागी कुणाला संधी? पाहा टीम इंडियाची प्लेईंग XI

Mumbai Local Megablock: रेल्वेमार्ग रविवारी मंदावणार! बेलापूर आणि पनवेलदरम्यान विशेष ब्लॉक; वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT