IPL 2024 | CSK vs RCB  Sakal
IPL

IPL 2024: रचिन, ग्रीन ते धोनी; चेन्नई - बेंगळुरू सामन्यात 'या' 5 खेळाडूंच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष

CSK vs RCB, Key Players: आयपीएल 2024 स्पर्धेत पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात होणार असून या सामन्यात कोणत्या 5 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष राहिल, याचा घेतलेला आढावा.

सकाळ डिजिटल टीम

CSK vs RCB, Key Players: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला शुक्रवारपासून (22 मार्च) सुरुवात होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळवला जाणार आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स यंदा नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. या हंगामापासून ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान, या सामन्यात कोणत्या 5 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष राहिल, हे पाहू.

रचिन रविंद्र (Rachin Ravindra)

वर्ल्डकप 2023 स्पर्धा गाजवलेला न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रला चेन्नई सुपर किंग्सने लिलावातून खरेदी केले. त्यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये चेन्नईकडून पदार्पण करताना दिसू शकतो. दरम्यान, त्याला पहिल्याच सामन्यातून पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तो या सामन्यात सलामीला फलंदाजी करू शकतो.

जर त्याला संधी मिळाली, तर त्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल. रचिन गेल्या वर्षभरापासून फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही कमालीचा खेळ करत आहे. त्याचमुळे त्याच्या फलंदाजीबरोबरच चेपॉकच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्याची गोलंदाजीही महत्त्वाची ठरू शकते.

ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad)

ऋतुराज गायकवाड गेली 4 वर्षे केवळ फलंदाज म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. पण आता तो कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्यावर एमएस धोनीचा नेतृत्वाचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी असणार आहे.

त्यामुळे आता ऋतुराज कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज म्हणून कशाप्रकारे कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green)

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने 2023 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. परंतु, त्याला 2024 आयपीएलपूर्वी मुंबईने बेंगळुरू संघाला ट्रेड केले. त्यामुळे आता ग्रीन बेंगळुरूकडून खेळताना दिसेल.

तो पहिल्याच सामन्यातून बेंगळुरूकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे. ग्रीन मधल्या फळीत फलंदाजी करण्याबरोबर वेगवान गोलंदाज म्हणूनही महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. त्यामुळे त्याच्याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

अल्झारी जोसेफ (Alzari Joseph)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने 11.50 कोटी रुपयांना अल्झारी जोसेफला लिलावातून खरेदी केले आहे. त्याला मिळालेली एवढ्या मोठ्या किंमतीने सर्वांनाच चकीत केले आहे. दरम्यान आता वेगवान गोलंदाज असलेला जोसेफ त्याला मिळालेल्या किंमतीला किती न्याय देऊ शकतो, हे पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जोसेफच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम आहे. त्याने 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 3.4 षटकात 12 धावा देत 6 विरेट्स घेतल्या होत्या.

एमएस धोनी (MS Dhoni)

चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी यंदा केवळ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे. तसेच यंदाचा हंगाम हा धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा देखील आहे.

त्यातच त्याने आयपीएल 2024 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच नेतृत्वपद सोडले असल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे. त्याचमुळे त्याच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Maharashtra Education: शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची होतेय खिचडी; एकच शिक्षक शिकवताहेत दोन-तीन विषय, भरती ठप्प झाल्याचा परिणाम

माेठी बातमी!'सातारा जिल्ह्यातील ८४ हजार बहिणी अपात्र'; चुकीच्या पद्धतीने घेतला १५१ कोटींचा लाभ, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT