IPL 2024 Lucknow Super Giants Lance Klusener coach Marathi News
IPL 2024 Lucknow Super Giants Lance Klusener coach Marathi News sakal
IPL

IPL 2024 : पांड्याला उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर LSGचा आणखी एक मोठा निर्णय! 'या' दिग्गज खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

Kiran Mahanavar

IPL 2024 Lucknow Super Giants News : इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीझन म्हणजेच आयपीएल 2024 साठी बिगुल वाजला आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या संघात मोठा बदल केला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसेनरची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच्यासोबत मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि सहकारी सहाय्यक प्रशिक्षक एस. श्री राम सोबत काम करणार आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स संघ 2022 साली इंडियन प्रीमियर लीगमध्ये सामील झाला होता. दोन्ही वर्षे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला, परंतु अद्याप विजेतेपद जिंकू शकलेले नाही. दोन्ही वेळा संघ एलिमिनेटरमध्ये बाहेर गेला आहे. लान्स क्लुसनर हे लखनऊच्या दक्षिण आफ्रिकन फ्रँचायझी डर्बन सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक देखील आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स संघाने नुकताच आणखी एक मोठा निर्णय घेतला होतो. गेल्या दोन हंगामात संघाचा उपकर्णधार असलेल्या कृणाल पांड्याकडून उपकर्णधारपद काढून वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनकडे सोपवण्यात आले आहे.

केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर पांड्याने गेल्या वर्षी संघाचे नेतृत्व केले होते. मात्र यंदाच्या हंगामात त्याच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. केएल राहुल सध्या दुखापतग्रस्त आहे आणि त्यामुळेच तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत नाहीये.

मात्र, आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. 22 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. मात्र, लीगचे पूर्ण वेळापत्रक अद्याप आलेले नाही. केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT