IPL 2024 Opening Ceremony ESAKAL
IPL

IPL 2024 Opening Ceremony : अक्षय-टायगर पासून सोनू-रेहमानपर्यंत... आयपीएल उद्घाटन सोहळ्याला 'हे' स्टार लावणार चार चाँद

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. हंगामाची सुरूवात ही चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याने सुरू होणार आहे. यापूर्वी आयपीएल उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, टायगर श्रॉफ गायक सोनू निगम आणि संगीतकार ए.आर. रेहमान हे आपली कला सादर करणार आहेत. हा कार्यक्रम चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी 6.30 मिनिटांनी सुरू होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या पहिल्या सामन्यात 22 मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामना खेळून, क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीगची सुरुवात होणार आहे. आयपीएल आयोजकांनी या मोसमातील सुरुवातीच्या लढतीवर थोडा वेगळा पवित्रा घेतला, गतविजेते विरुद्ध उपविजेतेचा ट्रेंड मोडून काढला, सीझनच्या पहिल्या सामन्यात एमएस धोनी विरुद्ध विराट कोहली यांच्या संघात लढत होणार आहे. हंगामात अनेक लक्षवेधी लढती होणार आहेत.

आयपीएलचा 17 वा हंगाम हा कमबॅकचा हंगाम म्हणून देखील ओळखला जाणार आहे. ऋषभ पंत अपघातानंतर आणि गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर तो पहिल्यांदाच व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे. तो डिसेंबर 2022 पासून खेळला नव्हता.

एमएस धोनी देखील गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर पहिलाचा सामना खेळणार आहे. हार्दिक पांड्या देखील घोट्याच्या दुखापतीनंतर मैदानावर उतरणार आहे. तो मुंबईचे नेतृत्व देखील करणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गणेशोत्सवात मुंबई वाहतुकीत बदल, नो पार्किंग झोनसह अनेक रस्ते बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Ganesh Chaturthi 2025: आश्रमातला उपद्रवी उंदीरच बनला बाप्पाचा साथीदार; वाचा बाप्पाच्या वाहनामागची अद्भुत गोष्ट

Dmart Offers : गणपतीसाठी DMart मधून कोणत्या वस्तू घ्याव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? गणेशोत्सवात बचत अन् सुविधा दोन्ही एका क्लिकवर

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटसाठी तू बरीच तडजोड केलीस, आता...' पुजारासाठी पत्नी पूजाची भावनिक पोस्ट

'वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; ठरणार प्रसाद ओकचा १०० वा चित्रपट

SCROLL FOR NEXT