IPL 2024 Play Off Equation  esakal
IPL

IPL 2024 Play Off Equation : काय सांगता... मुंबई अन् आरसीबी अजूनही गाठू शकतात प्ले ऑफ; फक्त देव ठेवावे लागणार पाण्यात

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Play Off Equation : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांची कामगिरी सुमार राहिली आहे. मात्र तरी देखील त्यांची प्ले ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता अजून मावळलेली नाही. आरसीबीने गेल्या तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी गुजरात टायटन्सचा 4 विकेट्सनी पराभव केला होता.

आरसीबी अशा प्रकारे जाऊ शकते प्ले ऑफमध्ये

आरसीबीने सलग तीन सामने जिंकले आहेत. तरी प्ले ऑफमध्ये पोहचण्याचा त्यांचा रस्ता फार कठीण आहे. आरसीबीचे 11 सामन्यात 8 गुण झाले आहेत. त्यांचे नेट रनरेट हे -0.049 इतके आहे. जर आरसीबीने आपल्या उर्वरित तीन सामने जिंकले तर त्यांचे 14 गुण होतात. आरसीबी पुढचे तीन सामने हे दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यासोबत होणार आहेत.

आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी हे तीन सामने जिंकणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर त्यांना हैदराबाद, लखनौ यांच्यापैकी एक संघ फक्त एक सामना जिंकावा अशी प्रार्थना करावी लागणार आहे. हैदराबादने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यांचे 12 गुण झाले आहेत. तर लखनौने 11 सामने खेळले आहेत. त्यांचेही 12 गुण झाले आहे.

आरसीबीला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोनपेक्षा जास्त सामने जिंकू नयेत यासाठी देखील देव पाण्यात ठेवावे लागतील. सीएसकेने 11 सामने खेळले आहेत. त्यांचे 12 गुण झाले आहे. तर दिल्लीने 11 सामन्यात 10 गुण पटकावले आहेत.

मुंबईचं प्ले ऑफचं कसं आहे गणित

मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचं टायटल जिंकलं आहे. ते देखील आयपीएलच्या 17 व्या हंगामात प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेले नाहीत. त्यांना अजूनही प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. मुंबईने 11 सामन्यात 6 गुण मिळवले आहेत. ते जास्तीजास्त 12 गुणांपर्यंत पोहचू शकतात. यासाठी त्यांना सनराईजर्स हैदराबाद, केकेआर, लखनौ सुपर जायंट्सविरूद्धचे आपले सामने जिंकावे लागतील.

याचबरोबर मुंबई इंडियन्सला हैदराबाद आणि लखनौ इथून पुढे एकही सामना जिंकू नयेत अशी प्रार्थना करावी लागेल. त्याचबरोबर सीएसके आपले तीन सामने गमवावे लागतील. दिल्ली कॅपिटल्सने देखील एकही सामना जिंकला नाही तर मुंबईला संधी आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांनी देखील दोनपेक्षा जास्त सामने जिंकू नयेत. जर या सर्व गोष्टी जुळून आल्या तर सहा संघ 12 गुणांवर येतील. यानंतर नेट रनरेटच्या आधारे प्ले ऑफ कोण खेळणार याचा निर्णय होईल.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT