Virat Kohli - Faf du Plessis | RCB | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

RCB win over GT: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवत प्लेऑफच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत.

Pranali Kodre

IPL 2024 RCB vs GT: आयपीएल 2024 सुरु झालं तेव्हापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत होती. त्यांच्याच गोलंदाजीविरुद्ध सनरायझर्स हैदाराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. पण उशीरा का होईना बेंगळुरूच्या गोलंदाजांना लय सापडली.

विशेष म्हणजे याच गोलंदाजांनी छोटं मैदान असलेल्या आणि फलंदाजांसाठी पर्वणी ठरणाऱ्या एम चिन्नास्वामी स्टेडियम शनिवारी गाजवलं. त्यांमुळे बेंगळुरूने या सामन्यात चौथ्या विजयाची नोंद केली.

आयपीएलच्या 52 व्या सामन्यात बेंगळुरू आणि गुजरात आमने-सामने होते. बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचा संघ पहिली बॅटिंग करायला उतरला, पण त्यांना काही लय सापडेना.

मोहम्मद सिराजने सुरुवातीला कमालीची गोलंदाजी करत वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांचा अडथळा दूर केला. तर ग्रीनने साई सुदर्शनला माघारी धाडलं. पॉवरप्लेमध्येच गुजरातने 3 विकेट्स गमावल्या.

तरी नंतर शाहरुख खान, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी छोटेखानी खेळी करत गुजरातला कसबसं 130 धावांपर्यंत पोहचवलं होतं. त्यात बाकी फलंदाजांनी थोडी भर घातली म्हणून किमान गुजरातला कसंबस 147 धावा उभारता आल्या.

शेवटच्या षटकात तर गुजरातने पहिल्या तीन चेंडूत तीन विकेट्स गमावल्या, त्यामुळे 150 धावांचा टप्पा त्यांच्यापासून दूर राहिला. यावेळी बेंगळुरूच्या सर्वच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. सिराज, यश दयाल अन् विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर ग्रीन आणि कर्ण शर्मालाही 1-1 विकेट मिळाली.

त्यानंतर 148 धावांचं सोपं लक्ष्य बेंगळुरू समोर होतं. बेंगळुरूसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने दणक्यात सुरुवात केली. या दोघांनीही 6 षटकांच्या आतच संघाला 90 धावांचा टप्पा पार करून दिला होता.

डू प्लेसिसने 18 चेंडूतच अर्धशतक झळकावलं होतं. पण डू प्लेसिसला 64 धावांवर जोशुआ लिटिलने बाद केलं अन् बेंगळुरूची पडझड सुरु झाली. जोशुआ लिटिलची गोलंदाजीच कोणाला समजेनाशी झाली.

त्याच्या घातक स्पेलमुळे डू प्लेसिसच्या विकेटनंतर अवघ्या 24 धावांत बेंगळुरूने तब्बल 5 विकेट्स गमावल्या जोशुआने रजट पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन या सर्वांनाच एकेरी धावसंख्येवर माघारी धाडलं. यादरम्यान, नूर अहमदनंही चांगली गोलंदाजी करत विल जॅक्स आणि विराट कोहलीचा अडथळा दूर केला.

गुजरातच्या या दोन गोलंदाजांनी अचानक सामन्यात प्राण फुंकले होते, परंतु, गुजरातकडे बेंगळुरूला विजयापासून रोखण्यासाठी पुरेशा धावाच नव्हत्या.

जोशुआच्या स्पेलनंतर दिनेश कार्तिकने स्वप्निल सिंगला साथीला बेंगळुरूला 14 व्या ओव्हरमध्येच सहज विजयापर्यंत नेले. या हंगामातील चौथ्या विजयामुळे बेंगळुरूने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्यात. आता हीच लय कायम ठेवत बेंगळुरू बाकी संघांना टेंशन देणार का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 317 अंकांनी वाढला; ऑटो-फार्मामध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा अतरंगी टिझर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही समोर

Sangli Children : चौदा महिन्यांचा श्रवण व अडीच वर्षांचा करण खेळताना पाण्याच्या टाकीत डोकावले अन्..., आई घरकामात व्यस्त घडलं भयानक

चाहत्याच्या वागण्यामुळे राजामौली संतापले!

Heatwave Survey : ‘हिवताप’ सर्वेक्षण सातारा जिल्ह्यात गतिमान; डेंगीचे ५९, मलेरियाचे ३९, तर चिकनगुनियाचे १७ रुग्‍ण आढळले

SCROLL FOR NEXT