rohit sharma csk esakal
IPL

IPL 2024 Rohit Sharma : '... जर धोनी निवृत्त झाला तर रोहित CSK चं नेतृत्व करू शकतो'

IPL 2024 Rohit Sharma : सीएसके आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू अंबाती रायुडूची मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Rohit Sharma CSK MS Dhoni : आयपीएलचा 17 वा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात होणार आहे. हंगामाला सुरूवाते होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने एक मुलाखत दिली.

ही मुलाखत रायुडूच्या अनेक वक्तव्यांमुळे सध्या प्रकाश झोतात आहे. त्याने मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माबाबत काही मोठी वक्तव्ये केली. रायुडू हा मुंबई इंडियन्सकडून देखील खेळला आहे.

अंबाती रायुडूने न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणे अवघड जाणार आहे. कारण मुंबई इंडियन्सचा सेटअप आणि गुजरातचा संघ यांच्यात मोठा परक आहे. पांड्याने आधी एक वर्ष मुंबईकडून खेळलायला हवं होतं मग कॅप्टन्सी करायला हवी होती.

रायुडू म्हणाला की, 'रोहित शर्मा अजून 5 ते 6 वर्षे आयपीएल खेळू शकतो. त्याला जर कर्णधार व्हायच असेल तर त्याच्यासाठी संपूर्ण जग खुलं असेल. तो पाहिजे त्या संघाचा कर्णधार होऊ शकतो.'

रायुडू रोहितबद्दल पुढे म्हणाला की, 'मला वाटते की रोहितने 2025 ची आयपीएल चेन्नई सुपर किंग्जकडून खेळावी. जर धोनी निवृत्त झाला तर रोहित संघाचे नेतृत्व देखील करू शकतो.'

रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 243 सामन्यात 6211 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स ही 24 मार्चला गुजरात टायटन्सशी भिडणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT