MS Dhoni Fan IPL Final esakal
IPL

MS Dhoni Fan IPL Final : धोनीसाठी चाहते रेल्वे स्टेशनवरही झोपले... काहींना मिळाला विराटचा आडोसा

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Fan IPL Final : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील फायनल पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (दि. 28) तुफान पाऊस पडला. यामुळे सामना राहू देत साधी नाणेफेक देखील झाली नाही. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर धोनी आपला अखेरचा आयपीएल सामना खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्सनी नरेंद्र मोदी स्टेडियम गच्च भरलं होतं. मात्र पावसामुळे त्यांची निराशा झाली.

जरी पावसामुळे ठरल्या दिवशी अंतिम सामना झाला नसला तरी सीएसकेचे चाहते पंच सामना राखीव दिवशी होईल याची अधिकृत घोषणा करेपर्यंत मैदानावरच थांबून होते. धोनीची त्याच्या चाहत्यांमध्ये इतकी क्रेझ आहे की सामना राखीव दिवशी म्हणजे आज (दि. 29) होणार म्हटल्यानंतर ते रेल्वे स्टेशनवरच झोपून होते. काही चाहत्यांनी तर पावसाच्या सरींपासून वाचण्यासाठी विराट कोहलीच्या मोठ्या बॅनरचा देखील आडोसा घेतला.

बीसीसीआयने जरी सामना राखीव दिवसावर गेला असला तरी कालची तिकीटे आजच्या सामन्यासाठी ग्राह्य धरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चेन्नईच्या काही चाहत्यांनी मोटेरामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची जर्सी घातलेले अनेक प्रेक्षक हे रेल्वे स्टेशनवर झोपल्याचे दिसले. त्यांनी बहुदा धोनीची एक झलक पाहण्यासाठी हा निर्णय घेतला असावा.

आयपीएलने याबाबत रविवारीच ट्विट केले की, 'आयपीएलच्या 16 व्या हंगामाची फायनल ही राखीव दिवशी घेण्यात येणार आहे. हा सामना 29 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होईल. सामन्याची रविवारची तिकीटे आज देखील वैध ठरणार आहेत. आम्ही विनंती करतोय की तिकीट जपून ठेवा.'

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनल सामना हा राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. सामना पुढे ढकलावा लागल्याने अनेक चाहत्यांची निराशा झाली होती. जवळपास रात्र 11 वाजता आयपीएलने सामना राखीव दिवशी घेणार असल्याची घोषणा केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT