Ishan-Kishan-Batting 
IPL

इशानला फॉर्ममध्ये परतण्यासाठी 'या' तीन क्रिकेटपटूंनी केली मदत

विराज भागवत

विजयी खेळीनंतर इशानने स्वत: सांगितला किस्सा

IPL 2021 MI vs RR: राजस्थान विरूद्ध झालेल्या 'करो या मरो'च्या सामन्यात मुंबईच्या संघाने एकतर्फी खेळ करत सामना जिंकला. राजस्थान संघाकडून सलामीवीर एव्हिन लुईसने झटपट २४ धावांची खेळी केली होती. पण त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांना केवळ ९० धावांपर्यंतच मजल मारता आली. हे सोपे आव्हान मुंबईच्या संघाने २ गड्यांच्या बदल्यात सहज पार केले. गेले काही सामने फॉर्मसाठी झगडत असलेल्या मुंबईच्या इशान किशनला राजस्थान विरूद्ध सूर गवसला. त्याने २५ चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकले.

राजस्थानविरूद्धच्या सामन्यानंतर इशान किशनला त्याच्या खेळीबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, "संघात परतल्याचा मला नक्कीच आनंद झालाय. त्यातच मला काही धावा करता आल्या याचाही आनंद वाटतोय. जेव्हा आम्ही गोलंदाजी केली त्याचवेळी आम्हाला खेळपट्टीचा अंदाज आला होता. आम्हाला कल्पना होती की चेंडू बॅटवर नीट येत नाही. त्यामुळे सरळ बॅटने खेळत राहण्याचा एकमेव पर्याय आमच्याकडे होता. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढउतार येतात. मी विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड या तिघांशी चर्चा केली होती. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला होता. आजचा विजय लक्षात ठेवून त्याच ऊर्जेने पुढचा सामना खेळणं हे आता आमच्यापुढे आव्हान आहे."

दरम्यान, इशान किशनने २५ चेंडूत झळकवलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ७० चेंडू आणि ८ गडी राखून राजस्थानचा धुव्वा उडवला. मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला आवश्यक असणाऱ्या नेट रनरेटमध्येही सुधारणा झाली. धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (२२) आणि सूर्यकुमार यादव (१३) दोघे लवकर बाद झाले. पण इशानने संघाला विजय मिळवून दिला. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Search December 2025 : डिसेंबर 2025 मध्ये गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च झाले? धक्कादायक रिपोर्ट आले समोर

Latest Marathi News Live Update : शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही; चित्रा वाघांचा ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

Phulambri News : शाळेसाठी जीव धोक्यात! एकदा पडले, तरी थर्माकोलवरून प्रवास सुरूच

MLA Jayant Patil: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढूया: आमदार जयंत पाटील; आघाडीबाबत नेमकं काय म्हणाले?

NMMC Election: कोट्यधीशांचा बोलबाला! नवी मुंबईमध्ये २६६ उमेदवारांची संपत्ती कोटीपार; पाहा यादी

SCROLL FOR NEXT