Ishan Kishan bowled by Arjun Tendulkar Mukesh Choudhary
Ishan Kishan bowled by Arjun Tendulkar Mukesh Choudhary ESAKAL
IPL

VIDEO : अर्जुन तेंडुलकरने दिली होती हिंट; किशनच्या मात्र डोक्यात शरलं नाही

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडिन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) पहिल्यांदाच भिडले. समोर चेन्नई सारखा कट्टर प्रतिस्पर्धी पाहून मुंबई आपल्या खेळात सुधारणा करेल असे वाटत होते. मात्र मुंबईचे येरे माझ्या मागल्या सुरूच राहिले. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या सीएसकेने मुंबईची पहिल्याच षटकात 2 बाद दोन धावा अशी अवस्था केली. मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माची शिकार केली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर इशान किशनचा (Ishan Kishan) उत्तम यॉर्करवर त्रिफळा उडवला.

विशेष म्हणजे इशान किशनचा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) सरावावेळी अशाच प्रकारे किशनची दांडी गुल केली होती. अर्जुनने एक प्रकारे इशान किशनला सामन्यात काय होऊ शकते याची हिंट दिली होती. मात्र इशान किशनच्या डोक्यात हे शिरलेच नसल्याचे दिसते. कारण सामन्याच्या पाचव्याच चेंडूवर मुकेश चौधरी या सीएसकेच्या डावखुऱ्या वेगावान गोलंदाजाने इशान किशनचा अर्जुन तेंडुलकर सारखाच त्रिफळा उडवला.

प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईने मुंबईला पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. मुकेश चौधरीने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला शुन्यावर बाद केले. त्यानंतर याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इशान किशन देखील बाद झाला. मुकेश चौधरीने त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसला 4 धावांवर बाद केलं. मुंबईची टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर सूर्यकुमार यादवने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोईन अलीच्या जागेवर आलेल्या सँटनरने त्याला 32 धावांवर बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT