Jasprit Bumrah Took 5 Wickets Against RCB  esakal
IPL

Jasprit Bumrah MI vs RCB : W,W,W,W,W... RCB चा उडाला फज्जा! अशी कामगिरी करणारा बुमराह ठरला इतिहासातील पहिला गोलंदाज

Jasprit Bumrah IPL 2024 Record : आरसीबीला एवढं मोठं खिंडार यापूर्वी कोणी पाडलं नव्हतं. जसप्रीत बुमराहनं आजच्या सामन्यात आरसीबीचा निम्मा संघ उडवला.

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Five Wickets Haul MI vs RCB : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यात जसप्रीत बुमराहनं भेदक मारा करत आरसीबीचा निम्मा संघ गारद केला. त्यामुळं दमदार सुरूवात करणारी आरसीबी 200 धावांचा टप्पा पार करणार असं वाटत असतानाच त्यांची गाडी 200 धावांच्या आतच अडकली.

जसप्रीत बुमराहला त्याच्या स्पेलमध्ये दोनवेळा हॅट्ट्रिकची संधी होती. मात्र त्याला ती दोन्हीवेळा साधता आली नाही. असं असलं तरी जसप्रीत बुमराह हा आरसीबीविरूद्ध पाच विकेट्स घेणारा आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.

आयपीएलच्या इतिहासात जसप्रीत बुमराह हा आरसीबीविरूद्ध 5 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याचबरोबर त्यानं रविंद्र जडेजा आणि संदीप शर्मा यांना देखील मागं टाकत आयपीएलमध्ये आरसीबीविरूद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाचा मान देखील पटकावला. त्यानं आरसीबीविरूद्ध आतापर्यंत 29 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये आरसीबविरूद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • जसप्रीत बुमराह - 29 विकेट्स

  • रविंद्र जडेजा - 26 विकेट्स

  • संदीप शर्मा - 26 विकेट्स

  • सुनिल नारायण - 24 विकेट्स

  • आशिष नेहरा - 23 विकेट्स

  • हरभजन सिंग - 23 विकेट्स

सामन्याबद्दल बोलायंच झालं तर जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर आरसीबीच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. त्यांच्या फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला. मात्र या तीनही फलंदाजांनी अर्धशतकी मजल मारल्यामुळे आरसीबीने 196 धावा केल्या.

कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 61 धावा केल्या. तर रजत पाटीदारने 26 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. स्लॉग ओव्हरमध्ये एका बाजूला जसप्रीत बुमराहनं विकेट्सचा सपाटा लावला असताना दुसऱ्या बाजूनं दिनेश कार्तिकने मुंबईच्या इतर गोलंदाजांना चोप दिला.

दिनेश कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. त्याने 230 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आरसीबीची लाज वाचवण्याचं काम केलं. त्याने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 5 चौकार मारत 9 चेंडूत 44 धावा वसूल करून घेतल्या. बुमराह पाठोपाठ श्रेयस गोपालने देखील चांगला मारा करत 4 षटकात 32 धावा देत एक विकेट घेतली.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT