Jay Shah | Rohit Sharma Sakal
IPL

Impact Player: रोहित शर्मासह अनेकांनी टीका केलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम IPL मधून होणार बाद? जय शाह म्हणाले...

Impact Player Rule: आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इम्पॅक्ट प्लेअर नियमावर रोहित शर्मासह अनेकांनी गेल्या काही दिवसात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा नियम कायम केला जाणार की नाही, यावर जय शाह यांनी भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Impact Player Rule: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सध्या भारतात सुरू आहे. ही स्पर्धा सुरू असताना सातत्याने खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर नियमावर टीका करताना दिसत आहेत. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. त्यानेही या नियमावर खुलेपणाने नाराजी व्यक्त केली होती.

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे 12 खेळाडू संघात खेळवण्याची परवानगी संघांना मिळते. मात्र, यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात धावा होत आहेत. अशात इम्पॅक्ट प्लेअरमुळे गोलंदाजांचे मरण होत असल्याच्या आणि अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी होत असल्याचे सूर क्रिकेटविश्वातून उमटल्याचे दिसले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी ही का नियम आयपीएल 2023 पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन हंगामापासून हा नियम आयपीएलमध्ये वापरला जात आहे. तथापि, हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र अद्याप लागू करण्यात आलेला नाही.

त्यामुळे आता आयपीएलमध्ये हा नियम पुढेही कायम होणार का अशा चर्चा होत आहेत. आता यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिले आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांनी याबाबत स्पष्ट उत्तर दिलेले नाही, पण त्यांनी हे सांगितले की याबाबतचा निर्णय चर्चांनंतर घेतला जाईल. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे दोन ज्यादाच्या भारतीय खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवता येते, या मुद्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

त्यांनी सांगितले की 'इम्पॅक्ट प्लेअर ही एक चाचणी होती. दोन नव्या भारतीय खेळाडूंना यामुळे आयपीएलमध्ये संधी मिळत आहे.'

तसेच त्यांनी सांगितले की 'आम्ही इम्पॅक्ट प्लेअरचा नियम पुढे कायम करायचा की नाही, हे ठरवण्यापूर्वी भागधारक, फ्रँचायधी आणि ब्रॉडकास्टर यांच्याशी चर्चा करू. तो नियम कायमसाठी नाही, पण अद्याप कोणीही त्या नियमाच्या विरुद्ध अभिप्राय दिलेला नाही.'

त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की फ्रँचायझीबरोबर लवकरच बैठक होणार आहे. पुढीलवर्षी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन असल्याने किती खेळाडू संघात कायम केले जावे, याबाबत चर्चा केली जाणार आहे.

तसेच चॅम्पियन्स टी20 लीग स्पर्धेला पुन्हा सुरू होणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले.

हार्दिक पांड्या खेळणार देशांतर्गत क्रिकेट

अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारात अ श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. याबाबत खुलासा करताना जय शाह यांनी सांगितले की त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळणार असल्याचे मान्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT