Kane Williamson New Zealand Cricket Team Mentor esakal
IPL

Kane Williamson : केन विलियम्सन वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघात परतणार मात्र रोल असणार वेगळा

अनिरुद्ध संकपाळ

Kane Williamson New Zealand Cricket Team Mentor : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यंदाचा आयपीएल हंगाम हा गुजरात टायटन्सकडून खेळत होता. मात्र आयपीएल 2023 च्या हंगामातील पहिल्याच समन्यात क्षेत्ररक्षण करताना के विलियम्सनचा गुडाघा दुखावला होता. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याने तातडीने आयपीएलमधून माघार घेतली. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यामुळे तो भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी देखील मुकला.

न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन वर्ल्डकपला मुकणे हा मोठा धक्का होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार केन विलियम्सन न्यूझीलंडच्या वर्ल्डकप संघासोबत भारतात दाखल होणार. संघ व्यवस्थापनाने केन विलियम्सन संघाचा मेंटॉर म्हणून संघासोबत ठेवण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी केन विलियम्सन वर्ल्डकप खेळण्यााबाबत अजून आशावादी आहेत.

केन विलियम्सनचे सीएसकेविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळताना उजव्या गुडघ्याचे लिगामेंट रप्चर झाले होते. यानंतर विलियम्सन भारत सोडून मायदेशात परतला होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तो रिहॅबिलिटेशन करत आहे.

दरम्यान, पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड संघाचे कोच स्टेड म्हणाले की, विलियम्सन वर्ल्डकप खेळण्याबाबत अजून इतक्यात आपण काही सांगू शकत नाही. त्याची शस्त्रक्रिया झाली आहे आताच्या घडीला इतकंच सांगू शकतो की ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. तो सध्या रिहॅबच्या सुरूवातीच्या टप्प्यात आहे.'

'त्याचा पायाला अजूनही पट्टी आहे. तो टप्प्या टप्प्याने दुखापतीवर मात करेल. केनबाबत आम्ही सध्या इतकंच सांगू शकतो की तो वर्ल्डकपसाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. मात्र आम्ही अशा गुणी खेळाडूला आताच संघाबाहेर करू शकत नाही. दुखापतीवर मात करून संघात परतण्याची त्याच्याकडे अजूनही संधी आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT