KKR vs RCB Karn Sharma IPL 2024  ESAKAL
IPL

KKR vs RCB : फिसकटलेला फिनिशिंग टच! कर्ण शर्मानं फलंदाजांचा भारही उचलला मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Karn Sharma Last Over Thriller But Royal Challengers Bengaluru lost Against Kolkata Knight Riders : आरसीबी आज पुन्हा जिंकता जिंकता हरली! चेस मास्टर म्हणून ख्याती असलेल्या आरसीबीला अनेक सामन्यानंतर आज चेस करण्याची संधी मिळाली होती. विराट अन् फाफनं खराब सुरूवात करून दिल्यानंतरही विल जॅक अन् रजत पाटीदार यांनी सामन्यात जीव ओतला. मात्र आंद्रे रसेलनं आरसीबीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. हरणाऱ्या आरसीबीसाठी कर्ण शर्मानं शेवटच्या स्टार फलंदाजाला लाजवेल असं काम केलं. मात्र शेवटी बॉलरच तो... फिनिशिंग टच देण्यात थोडा कमी पडला!

केकेआरच्या 223 धावांचा पाठलाग करताना आरसीबीनं 3 षटकात 2 बाद 35 धावा अशी सुरूवात केली. त्यानंतर विल जॅक अन् रजक पाटीदार यांनी षटकारांचा अन् चौकारांचा रतीबच लावला. विलनं 32 चेंडूत 55 तर पाटीदारनं 23 चेंडूत 52 धावा ठोकल्या. या दोघांनी आठ षटकातच शतकी भागीदारी रचली. यामुळं आरसीबीनं 11 षटकात 137 धावांवर मजल मारली.

मात्र आंद्रे रसेल नावाच्या वादळानं विल अन् पाटीदार या दोघांची एकाच षटकात शिकार करत पारडं पुन्हा केकेआरच्या बाजून झुकवलं. रजत अन् विलला अर्धशतकानंतर मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

त्यानंतर ग्रीन अन् महिपाल देखील स्वस्तात माघारी परतले. आता सामन्यावर केकेआरची पकड मजबूत झाली होती. तसं प्रभुदेसाईनं फटकेबाजी केली.. सामना जवळ आणला, मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. दिनेश कार्तिक देखील क्रिजवर होता. त्यानंही 18 चेंडूत 25 धावा केल्या. मात्र अपेक्षित स्ट्राईक रेट काही त्याला राखता आला नाही.

सामना जिंकण्यासाठी आरसीबीला 7 चेंडूत 21 धावांची गरज होती त्यावेळी रसेलनं कार्तिकची रवानगी पॅव्हेलियनमध्ये केली. कार्तिक बाद झाल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी आशाच सोडून दिली होती. मात्र मैदान सोडणाऱ्या चाहत्यांना कर्ण शर्मा नावाच्या एका गोलंदाजानं मागं फिरायला भाग पाडलं.

सामना जिंकायला 6 चेंडूत 21 धावांची गरज, कार्तिकही पॅव्हेलियनमध्ये पोहचलेला.. त्यात समोर मिचेल स्टार्क सारखा आग ओकणारा गोलंदाज होता. मात्र कर्ण शर्मानं या स्टार्कची खांडोळी करून टाकली.

पहिल्याच चेंडूवर षटकार मारत कर्ण शर्मानं सर्वांच लक्ष आपल्याकडं वेधलं. सर्वांना वाटलं चुकून षटकार गेला की काय...? मात्र यात कर्ण शर्मानं तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग दोन षटकार मारत स्टार्कचा सगळा स्टारडम घालवून टाकला.

आरसीबी आता सामना जिंकण्याच्या स्थितीत होती. 2 चेंडूत 3 धावांची गरज होती. आरसीबीचं नशीबच फाटकं! कर्ण शर्मा पाचव्या चेंडूवर बाद झाला अन् पुढच्या चेंडूवर सामना टाय करण्यासाठी आटापिटा करणारा फर्ग्युसन देखील धावबाद झाला. केकेआरनं सामना अवघ्या 1 धावेनं जिंकला!

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT