KKR Captain Shreyas Iyer Pose like Shahrukh Khan esakal
IPL

Video : शाहरूखच्या पोरीसमोरच अय्यरची 'शाहरूखगिरी'

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) याच्यातील सामन्यात केकेआरने पंजाबचा 6 विकेट राखून पराभव केला. केकेआरने स्पर्धेतील आपला दुसरा विजय साजरा केला. केकेआर सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहचली आहे. केकेआर आणि पंजाब यांच्यातील सामन्यात प्रेक्षक गॅलरीत अनेक स्टार्स आणि स्टारकिड्स दिसत होते. केकेआरचा संघ मालक शाहरूख खानची मुले आर्यन खान (Aryan Khan), सुहाना खान (Suhana Khan) देखील आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानावर आले होते.

मात्र या स्टार किड्सच्या उपस्थितीत देखील केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर भाव खाऊन गेला. त्याने सामन्यादरम्यान प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याची पोज देत सर्वांचेच मनोरंजन केले. विशेष म्हणजे अय्यरने ही पोज पंजाबचा शाहरूख खान बाद झाल्यानंतर दिली होती. सध्या याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पंजाबचा धडाकेबाज फलंदाज शाहरूख खानला केकेआरच्या टीम साऊदीने खाते उघडण्यापूर्वीच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंजाब अडचणीत असताना शाहरूख खान (Shahrukh Khan Indian Cricketer) भोपळाही न फोडता बाद झाल्याने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरचा आनंद गगनात मावत नव्हता. शाहरूख खानचा कॅच नितीश राणाने पकडला. राणाने कॅच पकडताच कर्णधार अय्यरने शाहरूख खानची आयकॉनिक पोज देत या विकेटचा जल्लोष साजरा केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स समोर 139 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना केकेआरने हे 139 धावांचे आव्हान 14.3 षटकात पार केले. केकेआरकडून आंद्रे रसेलने 31 चेंडूत 70 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने 8 सिक्स तर दोन चौकार मारले. तर सॅम बिलिंग्जने देखील 23 चेंडूत 24 धावा करत रसेलला मैल्यवान साथ दिली. कर्णधार श्रेयस अय्यरने देखील विजयात 26 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT