ipl |  
IPL

IPL 2022 : मुंबईच्या विजयाची प्रतीक्षा संपणार?

पुण्यातील स्टेडियममध्ये आज कोलकता नाइट रायडर्सशी झुंजणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही. पहिल्या दोन लढतींत या संघाला हार सहन करावी लागली आहे. आता सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ उद्या पुण्यात होणाऱ्या लढतीत कोलकता नाइट रायडर्सचा सामना करेल. या वेळी ‘मुंबई पलटण’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संघाची विजयाची प्रतीक्षा संपेल का? या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तमाम मुंबईकर क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई इंडियन्सला सलामीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्सनेही या संघाला हरवले. ललित यादव व अक्षर पटेल या जोडीने सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला विजयापासून दूर नेले; तर दुसऱ्या लढतीत फलंदाजांनी घात केला. रोहितला पहिल्या दोन लढतींत मोठी खेळी करता आली नाही, पण सर्वाधिक १५.२५ कोटींची बोली लागलेला ईशान किशन धडाकेबाज फलंदाजी करतोय. इशान व रोहित ही जोडी जमल्यास मुंबई इंडियन्सचा संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरू शकतो.

मुंबई इंडियन्सच्या चमूत उद्याच्या लढतीत बदल झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. सूर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन झाल्यास मधली फळी मजबूत होईल. तिलक वर्माने मागील लढतीत आपली धमक दाखवली. त्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्‍चित असेल. कायरॉन पोलार्डकडे अनुभव आहे. त्याची फलंदाजीही बहरायला हवी.

एकटा बुमराह चमकतोय

मुंबई इंडियन्सचा संघ यंदा गोलंदाजीत मार खातोय. जसप्रीत बुमराह वगळता एकालाही आपला ठसा उमटवता आलेला नाही. डॅनियल सॅम्स, बसील थम्पी, मुरुगन अश्‍विन यांच्याकडून निराशा झाली. तेईमल मिल्स याने मागील लढतीत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज बाद केले खरे, पण त्याच्या कामगिरीतही सातत्य असायला हवे; अन्यथा एकटा बुमरा किती दबाव झेलणार, हाही प्रश्‍न या वेळी संघ व्यवस्थापनासमोर उभा ठाकला असेल.

अय्यरची सेना फॉर्ममध्ये

  • कोलकता नाइट रायडर्सचा संघ या मोसमात छान कामगिरी करतोय. या संघाने गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज व पंजाब किंग्ज या दोन संघांना हरवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या संघाविरुद्धची लढत त्यांना गमवावी लागली आहे, पण संघातील बहुतांशी खेळाडू फॉर्ममध्ये आहेत.

  • अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, कर्णधार श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल यांनी मोक्याच्या क्षणी धावा केलेल्या आहेत. नितीश राणाला अद्याप सूर गवसलेला नाही, पण याचा फटका त्यांना अद्याप बसलेला नाही.

  • उमेश यादव, टीम साऊथी हे वेगवान गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत आहेत. वरुण चक्रवर्ती व सुनील नारायण हे फिरकीपटूही प्रतिमेला साजेशी कामगिरी करताहेत. याचाच अर्थ मुंबई इंडियन्ससाठी हा पेपर सोपा नसेल एवढे मात्र पक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT