KL Rahul IPL Record  esakal
IPL

KL Rahul IPL Record : राहुल स्लो असला म्हणून काय झालं आज भावानं ढासू रेकॉर्ड केलाय!

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul IPL Record : आयपीएलच्या 30 व्या सामन्यात आज आयपीएलमधील दोन नवे संघ गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 135 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने संथ सुरूवातीनंतर 50 चेंडूत 66 धावांची खेळी करत शंभरच्या आत अडकलेली गुजरातची गाडी 135 धावांपर्यंत पोहचवली. दरम्यान, गुजरातने विजयासाठी ठेवलेले 136 धावांचे आव्हान पार करताना लखनौची सलामी जोडी केएल राहुल कायल मेयर्स यांनी आश्वासक सुरूवात केली. केएल राहुलने दरम्यान एक मोठा विक्रमही केला.

यंदाच्या आयपीएल हंगामात आपल्या स्लो स्ट्राईक रेटमुळे टीकेचा धनी झालेल्या केएल राहुलने गुजरातविरूद्धच्या आजच्या सामन्यात बऱ्यापैकी आक्रमक सुरूवात केली. यामुळे लखनौने 6 षटकात बिनबाद 53 धावांपर्यंत मजल मारली. यात केएल राहुलच्या 30 धावांचा समावेश होता. राहुलने या 30 धावा 19 चेंडूत केल्या आहेत. याचदरम्यान त्याने एक मोठा विक्रम देखील केला.

केएल राहुल हा टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 7000 धावा पूर्ण करणार भारतीय फलंदाज ठरला आहे.

तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार हार्दिक पांड्याने 50 चेंडूत 66 धावांची दमदार खेळी केली. तर सलामीवीर वृद्धीमान साहाने 47 धावा करत मोलाचे योगदान दिले. मात्र साहा आणि पांड्याने चांगली सुरूवात करून देखील मधल्या षटकांमध्ये गुजरातची गाडी अडली होती. त्यांना 16 षटके झाली तरी शतक पार करता आले नाही. अखेर हार्दिक पांड्याने आपला गिअर बदलला आणि गुजरातचा जीव भांड्यात पडला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT