kl rahul trolled after scoring slow fifty
kl rahul trolled after scoring slow fifty 
IPL

'मी तर 600 रन केल्या'..: लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल झाला ट्रोल

Kiran Mahanavar

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात लखनौचा 14 धावांनी पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलच्या एलिमनेटर सामन्यात पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला. नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 4 बाद 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौच्या संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावाच करता आल्या. केएल राहुलचा संघ 14 धावा दूर राहिला. (kl rahul trolled after scoring slow fifty)

रजत पाटीदारने कारकिर्दीतील पहिले शतक केले. त्याने फक्त 54 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी करत विजयाचा हिरो ठरला. या विजयासह बंगळुरूने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. पुढाचा सामना त्यांचा 27 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.

कालच्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने लखनौसाठी पुन्हा एकदा चांगली फलंदाजी केली. केएल राहुल बाद होण्यापूर्वी 58 चेंडूत 79 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट केवळ 136 होता, यावरून आता चाहते अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. एवढेच नाही तर संघ 208 धावांचा पाठलाग करत असताना राहुलने संथ गतीने खेळत 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

केएल राहुलची गाडी सुरुवातीला ज्या संथ गतीने धावत होती तेच शेवटी लखनौच्या पराभवाचे कारण ठरले. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते त्याला वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल करत आहेत. एका चाहत्याने तर सांगितले की तो प्रत्येक हंगामात फक्त ऑरेंज कॅपसाठी खेळतो. एका चाहत्याने राहुलची खिल्ली उडवली आणि त्याचा फोटो शेअर करत लिहिले, या हंगामात 600 धावा केल्या, खूप आनंद झाला. हार और जीत लगी रहती है।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT