Kuldeep Yadav Injury MI vs DC IPL 2024  esakal
IPL

Kuldeep Yadav MI vs DC : मुंबईविरूद्धच्या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का; विकेट टेकर गोलंदाज बसणार बेंचवर?

अनिरुद्ध संकपाळ

Kuldeep Yadav MI vs DC IPL 2024 : डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव सध्या ग्रोइन निगल हाताळत आहे आणि सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगदरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांतीची शिफारस केली आहे.

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध डीसीच्या सामन्यानंतर 29 वर्षीय खेळाडूला अस्वस्थता आली, जी दुर्दैवाने संघाच्या पराभवात संपली.

त्याच्या दुखापतीमुळे, कुलदीपला त्यानंतरच्या सामन्यांमधून बाहेर बसावे लागले, अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमनाची संधी मिळाली. आता पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार कुलदीप मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात देखील खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

पीटीआयला आयपीएल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलदीप यादवला मॅच फिट होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे.

कुलदीप हा बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू आहे. त्याचबरोबर तो आगमी टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संभाव्य भारतीय संघात देखील स्थान मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुलदीपच्या रिहॅबिलेटशनमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीतील व्यवस्थापन जातीनं लक्ष घालत आहे.

फ्रेंजायजींना अशा खेळाडूंच्या दुखापतीबाबत प्रत्येक रिपोर्ट हा एनसीएला द्यावा लागणार आहे. कुलदीप जरी फ्रेंचायजीसोबत असला तरी तो प्रत्येक सामना खेळेल याची शाश्वती नाही. तो रविवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स सोबतच्या सामन्यात देखील खेळण्याची शक्यता कमी आहे.

कुलदीपने आयपीएलच्या दोन सामन्यात तीन विकेट्स घेत दिल्लीसाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने 7.62 च्या सरासरीने धावा देत किफायतशीर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्याची सध्याची कामगिरी ही उत्कृष्ट आहे. त्याने इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार सामने खेळत 19 विकेट्स घेतल्या होत्या.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: वर्ध्यामध्ये शेतात संत्र्यांचा पडला सडा, ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतोनात नुकसान

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT