IPL 2023 LSG Home Ground Tickets
IPL 2023 LSG Home Ground Tickets  esakal
IPL

IPL 2023 LSG : केएल राहुलच्या LSG ची तिकीट खिडकी सुनी सुनीच! किंमतीत 30 टक्क्यांनी केली कपात

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 LSG Home Ground Tickets : लखनौ सुपर जांयट्स यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्यांदाच आपल्या होम ग्राऊंडवर सामने खेळणार आहे. लखनौचे भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम हे लखनौचे होम ग्राऊंड आहे. या स्टेडियमवर 1 एप्रिलला झालेल्या लखनौच्या सामन्यात प्रेक्षकांनी म्हणावी तशी गर्दी केली नव्हती. त्यामुळे आयोजकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

यामुळे आयोजकांनी आता 7 एप्रिलला होणाऱ्या लखनौ विरूद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यासाठी तिकीट दरात 30 टक्के कपात केली आहे. आधी लखनौच्या स्टेडियमवरील तिकीट रक्कम ही 499 रूपये होती. मात्र आता लोकांसाठी याची किंमत 349 केली आहे. याचबरोबर दुसऱ्या श्रेणीमधील तिकीटांचे देखील दर कमी करण्यात आले आहेत.

अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही जवळपास 50 हजार इतकी आहे. या मैदानावर एक एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला होता. यावेळी जवळपास 35 हजार सीट रिकाम्या होत्या. सामन्यापूर्वी पेटीएम इनसाईडरने 80 टक्के तिकीट विक्री झाल्याचा दावा केला होता. मात्र सामना सुरू झाल्यावर हा दावा फोल ठरला.

यानंतर याबाबत सर्व स्तरातून प्रश्न विचारण्यात येऊ लागले. दरम्यान आयोजकांनी आपल्या तिकीट दरात मोठी कपात केली आहे. इकाना स्टेडियमवरील सर्वात महाग तिकीट हे 14000 हजार रूपयांचे मिळते. यापूर्वी याची किंमत 22000 हजार इतकी होती. लखनौ सुपर जायंट्सचे हे होम ग्राऊंड आहे. लखनौने पहिल्याच सामन्यात दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला होता.

भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर दुसरा सामना हा लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना 7 एप्रिलला होणार आहे. यानंतर पंजाब किंग्ज, गजरात टायटन्स, आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज देखील या मैदानावर खेळण्यासाठी येणार आहेत.

कमी केलेले तिकीट दर

आधी आता

499 349

699 499

950 750

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT