MI vs LSG IPL 2024 Play Off Scenarios esakal
IPL

MI vs LSG IPL 2024 : लखनौ अजूनही जाऊ शकते प्ले ऑफमध्ये फक्त मुंबईला इतक्या धावांनी द्यावी लागेल मात

अनिरुद्ध संकपाळ

MI vs LSG IPL 2024 Play Off Scenarios : आयपीएलच्या 67 व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर गेले आहेत. लखनौचे जरी प्ले ऑफचे गणित अवघड असलं तरी त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवला तर प्ले ऑफ गाठण्याची संधी अजूनही आहे. मात्र त्यासाठी त्यांना अशक्यप्राय असं काम करावं लागणार आहे. आधी केएल राहुलला नाणेफेक जिंकावी लागणार असून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.

लखनौ कशी जाऊ शकतो प्ले ऑफमध्ये?

लखनौ सुपर जायंट्स ही प्ले ऑफच्या कुठंही पिक्चरमध्ये नाही. मात्र ते अधिकृतरित्या अजून प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर गेलेले नाहीत. त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी आधी मुंबई इंडियन्सचा पराभव करवा लागेल. मात्र फक्त विजय पुरेसा ठरणार नाहीये. त्यांना चेन्नई आणि आरसीबी सामन्याच्या निकालावर देखील अवलंबून रहावे लागणार आहे.

लखनौला जर प्ले ऑफ गाठयचं असेल तर त्यांना मुंबईविरूद्ध प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. जरी लखनौने विजय मिळवला आणि 18 तारखेला चेन्नई हरली तरी नेट रनरेट मोठी भुमिका बजावणार आहे. जर आरसीबीने सीएसकेला मात दिली तर आज लखनौला मुंबईविरूद्धचा सामना हा जवळपास 310 धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

असं झालं तरी आरसीबी सीएसकेविरूद्ध किती मार्जिनने जिंकते त्यावरही लखनौचे भवितव्य अवलंबून असणार आहे. लखनौचे सध्याचे नेट रनरेट हे -0.787 इतके आहे. यामुळे त्यांची प्ले ऑफची आशा मावळली नसली तरी लखनौसमोर अशक्यप्राय असं आव्हान असणार आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

SCROLL FOR NEXT