Marcus Stoinis Give Historical Defeat To Chennai Super Kings
Marcus Stoinis Give Historical Defeat To Chennai Super Kings  esakal
IPL

Marcus Stoinis CSK vs LSG : स्टॉयनिसनं सीएसकेवर फिरवला वरवंटा; चेपॉकचा किल्ला ढासळला

अनिरुद्ध संकपाळ

Marcus Stoinis Chennai Super Kings Vs Lucknow Super Giants IPL 2024 : 19 एप्रिल... चेन्नईचा संघ लखनौमध्ये नवाबी थाटात पोहचला होता. मुंबईला मुंबईत मात दिल्यानं एसकेच्या चांगल्याच बेडक्या फुगल्या होत्या. मुंबई झाली आता लखनौ सर करायचं अन् प्ले ऑफच्या उंबरठ्यावर पोहचायचं असं धोनी दादा अन् ऋतु भाईचं प्लॅनिंग होतं.

मात्र तिकडं लखनौंनं पिवळ्या जर्सीचं स्वागत पराभवानं केलं. एकाना स्टेडियमवर धोनी चमकला मात्र विजयी टिळा लखनौच्या माथी लागला. चेन्नईचं 176 धावांच आव्हान पार करताना केएल राहुल अन् डिकॉकनं नाबाद 134 धावांची सलामी दिली. लखनौंन चेन्नईचा 8 विकेट्स राखून पराभव केला. कर्णधार राहुलनं 82 धावांची तडाखेबाज खेळी केली होती.

चेन्नईला असा सहज पराभव नक्कीच पचनी पडला नसणार. या सामन्यानंतर दोन्ही संघ अवघ्या तीन दिवसात पुन्हा भिडणार होते. यावेळी मात्र मैदान चेपॉकचं होतं. सीएसके घरात खेळणार होती. लखनौप्रमाणं सीएसके देखील हंगामात होम ग्राऊंडवर हरली नव्हती. तब्बल 8 विकेट्सनी दिलेल्या पराभावची सल सीएसकेच्या मनात होती.

आता घरात बोलवून लखनौकरांचा पानउतारा करण्याचा त्यांचा मनसुबा होता. मात्र अदब से वागणाऱ्या लखनौंन चेन्नईत आल्यावर अदबच सोडली. सीएसकेच्या कर्णधारानं नाणेफेक गमाल्यानंतरही मोठ्या कष्टानं 210 धावांचा टप्पा गाठला. शिवम दुबेनं पॉवर गेम दाखवत लखनौला भिती घातली.

मात्र लखनौचा छुपा रूस्तम मार्कस स्टॉयनिसनं चेन्नईला त्यांच्याच प्रेक्षकांसमोर तोंडघशी पाडलं. जो खेळाडू गेल्या सात सामन्यापासून शांत होता. त्यानं आजच शांतीत क्रांती करून चेन्नईला ऐतिहासिक हार दिली. यापूर्वी चेन्नविरूद्ध 210 धावा कोणी चेस केल्या नव्हत्या. ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं.

पहिल्याच षटकात डिकॉक बाद झाला त्यानंतर केएलनं देखील साथ सोडली. लखनौची अवस्था 2 बाद 33 धावा अशी झाली. आता मदार होती ती आऊट ऑफ फॉर्म असलेल्या स्टॉयनिसवर! स्टॉयनिसचा गेल्या सात सामन्याती फॉर्म पाहता तो फार काही करू शकेल असं वाटत नव्हतं.

मात्र या ऑस्ट्रेलियन खेळाडूंन झुंजारपणा काय असतो त्यांचा वस्तूपाठच घालून दिला. या पठ्ठ्यानं एकट्यानं 128 धावा चोपल्या. बरं हा आपलं शतक झाल्यावर गाशा गुंडाळून परतला नाही तर संघाच्या विजयासाठी शेटच्या षटकापर्यंत लढला अन् जिंकला ही! यात पूरनच्या 34 अन् हुड्डाच्या 6 चेंडूत केलेल्या नाबाद 17 धावांच देखील योगदान आहे. मात्र सिंहाचा वाटा उचलला तो स्टॉयनिसनं!

स्टॉयनिसनं तब्बल 13 चौकार 6 षटकार अन् 196 च्या स्ट्राईक रेटनं 63 चेंडूत 128 धावा चोपल्या. चेन्नईची गोलंदाजी इतकी हतबल कधी झाली नव्हती. त्यामुळं चेन्नईला आता आपल्या गोलंदाजीचा विषय सोडवावा लागणार आहे. स्टॉयनिसच्या या खेळीमुळं ऋतुराजच्या 108 धावांच्या शतकी खेळीचा विषयच संपला! लखनौनं चेन्नई सर करत गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. ते आता गुणांच्या बाबतीत डबल डिजीट मध्ये पोहचले आहेत.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT