Virat Kohli IPL 2023 Michael Vaughan esakal
IPL

Virat Kohli IPL : विराटची मानसिकता फक्त 18 षटके खेळण्याची... मायकल वॉनने मारला टोमणा

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IPL 2023 Michael Vaughan : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा सलामीवीर विराट कोहली सध्या आयपीएलच्या 16 व्या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 8 सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. अर्धशतकांचा रतीब घालणाऱ्या विराट कोहलीवर कोणी टीका करेल असे वाटत नाही. मात्र हे धाडस इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केले. विराट कोहलीने केकेआरविरूद्ध 37 चेंडूत 54 धावांची खेळी केली. यानंतर आरसीबीच्या काळजीवाहू कर्णधार विराटवर मायकल वॉनने निशाना साधला.

मायकल वॉन क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, 'अनेक संघ विराट कोहलीचा स्पिनर्सविरूद्धचा त्याचा स्ट्राईक रेट पाहून त्याच्याविरूद्ध स्पिनर्सला गोलंदाजी देण्याची रणनिती अवलंबत आहेत. ते विराट कोहलीला फिरकीच्या जाळ्यात अडकवून मिड विकेटला तीन क्षेत्ररक्षक ठेवत आहेत.'

मायकल वॉन पुढे म्हणाला की, 'मला असे वाटते की पॉवर प्ले नंतर विराट कोहलीची मानसिकाता ही 18 व्या षटकापर्यंत खेळपट्टीवर थांबण्यांची असते. मला वाटत नाही तो चौकार मारण्याचा फार विचार करतोय. मला असे वाटते की त्याने अधिक चौकार मारण्याचा प्रयत्न करावा त्याच्याकडे ती क्षमता आहे. वेळ आल्यावर षटकारही मारायला हवा.'

इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या मते आरसीबीने त्यांना मधली फळी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवेल या आशेवर बसून राहू नये. विराट कोहलीने षटकार चौकार मारण्यास सुरूवात करावी. त्याने थोडी जोखीम घ्यावी आणि फटकेबाजी करावी.' आरसीबी सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी 8 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेतील पहिले चार संघ प्ले ऑफ खेळणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT