Mohammad Azharuddin Says Include Arjun Tendulka
Mohammad Azharuddin Says Include Arjun Tendulka esakal
IPL

अझहरूद्दीनचा MI ला सल्ला; प्लेईंग इलेव्हनमध्ये तेंडुलकर नाव जोडा, नशीब बदला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात 5 वेळा आयपीएल टायटल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अवस्था फारच बिकट झाली आहे. मुंबईने आतापर्यंतचे सहाच्या सहा सामने गमावले आहे. सध्या ते शुन्य गुणांसह गुणतालिकेत तळातल्या स्थानावर आहे. आता त्यांचा पुढचा सामना हा चेन्नई सुपर किंग्ज बरोबर 21 एप्रिलला होणार आहे. चेन्नईची स्थिती देखील मुंबईसारखीच आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीनने (Mohammad Azharuddin) मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनलाा एक सल्ला दिला आहे.

मोहम्मद अझहरूद्दीनने नॉट जस्ट क्रिकेट या टॉक शोमध्ये बोलताना मुंबईला आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला. अझहरूद्दीन म्हणाला की, आता मुंबई इंडियन्सला आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची गरज आहे. आता मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संघात सामील करायला हवे. मुंबईने आता काही नव्या खेळाडूंना संधी द्यायला हवी. तुम्ही अर्जुन तेंडुलकरला संधी देऊ शकता. तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये स्वतः ला सिद्ध केले आहे. काय सांगावं तेंडुलकर नाव संघाशी जोडले गेल्यावर संघाचे भाग्य बदलून जाईल.

अझहरूद्दीनने मुंबई इंडियन्सला 8.25 कोटी रूपये खर्चून संघात घेतलेल्या टीम डेविडला (Tim David) देखील खेळवण्याचा सल्ला दिला. डेव्हिडला न खेळवणे हे आश्चर्यकारक आहे. त्याला जर खेळवायचे नव्हते तर मग त्याला संघात सामील का करून घेतले. तुमच्याकडे एक चांगला खेळाडू आहे आणि तो तुम्ही बेंचवर कसा बसवून ठेवू शकता. असाही सवाल अझरूद्दीनने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT