PBKS vs GT Mohit Sharma  esakal
IPL

PBKS vs GT : गुजरातच्या गतवर्षीचा नेट बॉलर नव्यान पदार्पण करत चमकाला, पंजाबला शाहरूख खाननं तारलं

अनिरुद्ध संकपाळ

PBKS vs GT : भारताकडून 34 सामने खेळणाऱ्या 34 वर्षाच्या मोहित शर्मावर गेल्या वर्षी गुजरात टायटन्सचा नेट बॉलर म्हणून वावरण्याची वेळ आली होती. सीएसकेच्या अनेक विजयात मोलाची भुमिका बजावल्यानंतर तो लिलावत अनसोल्ड राहिला होता. अखेर हार्दिक पांड्याने आज पंजाब किंग्ज विरूद्ध त्याला संधी दिली अन् त्याने संधीच सोनं करत 4 षटकात 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

मोहितसह गुजरात टायटन्सच्या इतर गोलंदाजांनी आजच्या सामन्यात टिच्चून मारा करत पंजाब किंग्जला 20 षटकात 8 बाद 153 धावांवर रोखले. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर स्लॉग ओव्हरमध्ये शाहरूख खानने 9 चेंडूत 22 धावा ठोकत पंजाबला दीडशतकी मजल मारून दिली.

गुजरातने नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं. पंजाबचे दोन्ही सलामीवीर 28 धावात माघारी गेल्यानंतर मॅथ्यू शॉर्टने बानुका राजापक्षेसोबत भागीदारी रचली. या दोघांनी संघाला 55 धावांपर्यंत पोहचवले. मात्र ही जोडी राशिद खानने फोडली. त्याने शॉर्टला 36 धावांवर बाद केले.

शॉर्ट बाद झाल्यानंतर जितेश शर्मा आणि राजपक्षे यांनी पंजाबला शंभरीजवळ पोहचवले. मात्र यामध्ये पंजाबची धावगती मंदावली. दरम्यान, मोहित शर्माने जितेश शर्माला 25 धावांवर बाद केले तर राजपक्षेला अल्झारी जोसेफने बाद करून दुसरा सेट फलंदाज माघारी धाडला. यानंतर मोहित शर्माने आयपीएल हंगामातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करनची 22 चेंडूतील 22 धावांची खेळी संपवली.

पंजाब किंग्जची अवस्था बिकट झाली असताना अखेर शाहरूख खान पंजाबच्या मदतीला धावून आला. त्याने 9 चेंडूत 22 धावांची दमदार खेळी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. यामुळे पंजाब गुजारतसमोर 153 धावांचे आव्हान उभे करू शकला.

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT