Mohsin Khan hand Injury esakal
IPL

Mohsin Khan hand Injury : त्यावेळी माझा हात कापावा लागला असता... मोहसिन खानने सांगितला तो भयानक प्रसंग

अनिरुद्ध संकपाळ

Mohsin Khan hand Injury : लखनौ सुपर जायंट्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई इंडियन्सच्या भल्या भल्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. त्याने टाकलेल्या शेवटच्या षटकामुळे लखनौने सामना 5 धावांनी जिंकला आणि आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवले. मुंबईला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती.

दरम्यान सामना जिंकल्यानंतर मोहसिन खानने आपल्या एका आजाराबद्दल माहिती दिली. जर तो डॉक्टरांकडे वेळत पोहचला नसता तर त्याला त्याचा हात गमवावा लागला असता. मात्र वेळेत शस्त्रक्रिया झाली अन् त्याचा हात बचावला. मात्र या शस्त्रक्रियमुळे त्याला संपूर्ण देशांतर्गत हंगाम आणि आयपीएलचे काही सुरूवातीचे सामने गमवावे लागले.

मोहसिन खानने सामन्यानंतर आपल्या त्या दुखापतीबद्दल सांगितले. तो म्हणाला, 'एक वेळ अशी होती की मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन असा विश्वास मला राहिला नव्हता. मला माझा हातच उचलता येत नव्हता. फार प्रयत्नानंतर जर तो उचलला तर तो पुन्हा लवकर सरळ होत नव्हता. हा एक वेगळा आजार होता. तो काळ आठवला तर आतही मला घाबरायला होतं. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर एक महिना जरी शस्त्रक्रियेला विलंब झाला तरी माझा हात कापावा लागला असता.'

24 वर्षाच्या मोहसिन खानने सांगितले की, 'मला वाटते की कोणत्याही क्रिकेटपूला हा आजार होऊ नये. हा वेगळाच आजार होता. माझ्या रक्तवाहिन्या बंद झाल्या होत्या. खांद्याच्याजवळ या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. उत्तर प्रदेश क्रिकेट संघ, राजीव शुक्ला सर आणि माझी फ्रेंचायजी लखनौ सुपर जायंट्स, माझे कुटुंबीय यांनी या कठिण प्रसंगात माला खूप पाठिंबा दिला, सहकार्य केले. शस्त्रक्रिया आणि त्यानंतर मी खूप कठिण काळातून गेलो. मात्र सर्वांनी माझी साथ दिली.'

शेवटच्या षटकाबद्दल बोलताना मोहसिन म्हणाला, 'शेवटचे षटक टाकताना दबाव होता हे सहाजिकच आहे. मी मैदानावर जे आम्ही सरावावेळी करतोय तेच करण्याचा प्रयत्न केला. मी 10 ते 11 धावा वाचवण्याबाबत विचार करत नव्हतो. मी फक्त सहा चेंडू चांगले टाकण्याचाच विचार करत होतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT