MS Dhoni esakal
IPL

MS Dhoni DC vs CSK : धोनी टी 20 क्रिकेटच्या इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच विकेटकिपर

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni DC vs CSK 300 Dismissal As Wicketkeeper : आयपीएल 2024 मधील 12 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात चेन्नईचा थला महेंद्रसिंह धोनीने एक मोठा माईल स्टोन गाठला. चेन्नईला 5 वेळा विजेतेपद जिंकून देणाऱ्या धोनीने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात विकेटकिपिंग करताना हा विक्रम केला आहे.

धोनीने विकेटकिपर म्हणून आपल्या टी 20 कारकिर्दीतील 300 वा बळी टिपला आहे. अशी कामगिरी करणारा तो टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विकेटकिपर ठरला. धोनीने स्टम्पच्या मागे 213 झेल आणि 87 स्टम्पिंग केले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर 43 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉचा धोनीने विकेटच्या मागे झेल पकडला. हा धोनीचा टी 20 क्रिकेटमधला 300 वा बळी ठरला.

धोनीनंतर टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा विकेटकिपर म्हणून पाकिस्तानच्या कामरान अकमलंच नाव येतं. त्याने 274 बळी टिपले आहेत. यात 172 झेल आणि 102 स्टम्पिंगचा समावेश आहे. त्यानंतर या यादीत दिनेश कार्तिक देखील 274 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 207 झेल अन् 67 स्टम्पिंग केले आहेत.

तिसऱ्या स्थानावर क्विंटन डिकॉक आहे. त्याने 221 झेल अन् 49 स्टम्पिंगसह 270 बळी टिपले आहेत. तर चौथ्या स्थानावर असलेल्या जॉस बटलरने 168 झेल अन् 41 स्टम्पिंगसह 209 बळी टिपले आहेत.

टी 20 मध्ये सर्वाधिक बळी टिपणारे विकेटकिपर

  • महेंद्रसिंह धोनी - 300

  • कामरान अकमल - 274

  • दिनेश कार्तिक - 274

  • क्विंटन डिकॉक - 270

  • जॉस बटलर - 209

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT