ms dhoni
ms dhoni 
IPL

MS Dhoni : "धोनी धोनीचा गजर अन् माझ्या डोळ्यात पाणी" कॅप्टन कुलने सांगितला मोदी स्टेडियमचा 'तो' इमोशनल क्षण

Kiran Mahanavar

MS Dhoni CSK vs GT IPL 2023 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले. या सीझनच्या सुरुवातीपासूनच धोनीचा हा शेवटचा सीझन असेल अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्येक मैदानावर चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या शक्यता वाढल्या. पण आता पाचवे विजेतेपद पटकावल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला, तुम्ही माझ्या निवृत्तीबद्दल उत्तरे शोधत आहात? परिस्थिती पाहता, माझी निवृत्ती जाहीर करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. पण या वर्षी मी कुठेही जाणार नाही, चाहत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल धन्यवाद. तथापि, माझ्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे पुढील नऊ महिने कठोर परिश्रम करणे आणि नंतर परत येऊन आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणे.

धोनी पुढे म्हणाला की, शरीरावर बरेच काही अवलंबून आहे त्यामुळे माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 6-7 महिने आहेत. माझ्यासाठी हे सोपे नाही, पण चाहत्यांसाठी ही भेट आहे. त्याने ज्या प्रकारे आपले प्रेम आणि आपुलकी दाखवली आहे, त्यावरून मला वाटते की मी त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. माझ्या करिअरचा हा शेवटचा भाग आहे म्हणून तू भावूक होतोस.

पुढे तो म्हणाला, इथून सगळ्याची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात मी मैदानावर आलो तेव्हा सर्व चाहते माझ्या नावाचा जयघोष करत होते. मग माझे डोळे पाण्याने भरले आणि मी काही वेळ तिथेच उभा राहिलो. मला याचा आनंद घ्यायचा आहे हे लक्षात आले. चेन्नईतही हीच भावना होती, तिथे माझा शेवटचा सामना होता, पण मला परत येऊन त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT