MS Dhoni Retirement
MS Dhoni Retirement  esakal
IPL

MS Dhoni Retirement : अखेर धोनीने सांगितलंच आयपीएलमधून कधी होणार निवृत्त, म्हणाला अजून...

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 10 व्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. ते आपल्या 5 व्या विजतेपदापासून फक्त एक पाऊल लांब आहेत. हंगामाची खराब सुरूवा करणाऱ्या चेन्नईने दमदार पुनरागमन करत थेट फायनल गाठली आहे. दरम्यान, हा महेंद्रसिंह धोनीचा हा शक्यतो शेवटचा आयपीएल हंगाम आहे असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता खुद्द धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

गुजरातला 15 धावांनी पराभूत करून फायनल गाठल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये हर्षा भोगले यांनी धोनीला खोदून खोदून विचारले की तुला पुढच्या वर्षी आम्ही चेपॉकवर खेळताना पाहणार का?

यावर आढे वेढे घेणाऱ्या धोनीने अखेर सांगितले की त्याच्याकडे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी अजून 8 ते 9 महिने आहेत. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावापर्यंत माझ्याकडे वेळ आहे असे तो म्हणाला. धोनी पुढे म्हणाला की मी कायम चेन्नईसाठी उपलब्ध असणार आहे. मग ते खेळाडू म्हणून असो किंवा मैदानाबाहेरचा कोणताही रोल असो.

धोनीने पुन्हा एकदा आयपीएलची फायनल गाठली. त्याला याबाबत विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला की, 'ही अजून एक फायनल असे म्हणता येणार नाही. आधी 8 संघात खेळली जायची आता 10 संघ झाले आहेत. खूप स्पर्धा वाढली आहे. हे दोन महिन्याच्या श्रमाचे फळ आहे. सर्व खेळाडूंनी या विजयात योगदान दिले आहे. आमच्या मधल्या फळीला फारशी संधी मिळालेली नाही.'

गुजरातबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, 'गुजरात हा एक जबरदस्त संघ आहे. ते धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे करतात. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात टॉस हरणेच योग्य होते. जर जडेजासाठी परिस्थिती अनुकूल असेल तर त्याला फटकेबाजी करणे खूप अवघड आहे. त्याच्या गोलंदाजीमुळे सामना फिरला. त्याची आणि मोईन अली भागीदारी विसरता कामा नये.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT