MS Dhoni is still hungry and Chennai Super Kings stay afloat in IPL 2022 Ravindra Jadeja SAKAL
IPL

धोनीची जादूगारी : जडेजा म्हणतो त्याची 'भूक' भागत नाही ही चांगली गोष्ट

महेंद्रसिंग धोनी अजूनही भुकेला

Kiran Mahanavar

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्जच्या आशा जिवंत आहे. महेंद्रसिंग धोनी अजूनही भुकेला आहे. कर्णधार रवींद्र जडेजासाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. चेन्नईने आतापर्यंत सातपैकी केवळ दोनच सामने जिंकले आहे. गुरुवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला धोनी ज्याने शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला. धोनीच्या 13 चेंडूत नाबाद 28 धावांच्या जोरावर चेन्नईने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर संस्मरणीय विजय नोंदवला आहे.(MS Dhoni Still Hungry)

जडेजा सामन्यानंतर म्हणाला, अजूनही धोनी भुकेलेला आहे. त्याची लय आजही कायम आहे. आम्हाला विश्वास होता की धोनी क्रीजवर आहे आणि तो सामना यशस्वीपणे पूर्ण करेल. त्याने भारतासाठी आणि आयपीएलमध्ये अनेक सामने जिंकले आहे आणि तो सामना यशस्वीपणे संपेल याची आम्हाला कल्पना होती.(IPL 2022 Ravindra Jadeja)

धोनीने त्याच्या जुन्या दिवसांप्रमाणेच फिनिशरची भूमिका उत्तमपणे निभावली. चेन्नईला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. अशा स्थितीत धोनीने जयदेव उनाडकटच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारला. तो शांत राहिला आणि शेवटच्या चेंडूवर त्याने शॉर्ट फाइन लेगवर विजयी चौकार ठोकला.

जडेजा म्हणाला सामना ज्याप्रकारे पुढे सरकत होती. आम्ही दडपणाखाली येत होतो. जगातील सर्वोत्तम फिनिशर क्रीजवर असल्याने मुंबई संघांवर दबाव होता. पण धोनी शेवटच्या चेंडूपर्यंत टिकला तर आम्ही सामना जिंकू, हे आम्हाला माहीत होते. शेवटचे दोन-तीन चेंडू तो चुकणार नाही असा आम्हाला विश्वास होता.

जडेजाने वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीचेही कौतुक केले, ज्याने मुंबईच्या टॉप ऑर्डरला ढासळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा चौधरी आमच्यासोबत नेट बॉलर होता. तेव्हा आम्ही पाहिले की तो चांगली गोलंदाजी करत आहे आणि चेंडू स्विंग करत आहे. त्याच्याकडे नवीन चेंडू स्विंग करण्याचे चांगले कौशल्य आहे. म्हणूनच आम्ही त्याला संघात ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT