MS Dhoni IPL 2024 esakal
IPL

MS Dhoni IPL 2024 : एम एस धोनीची नवी पोस्ट, नव्या 'रोल'चा फोडला बॉम्ब

MS Dhoni IPL 2024 New Post : महेंद्रसिंह धोनीच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे चेन्नईचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियावर पोस्ट केली की त्याच्या चाहत्यांना धडकीच भरते. आयपीएल 2024 च्या हंगामाला अवघे काही दिवस राहिले असताना महेंद्रसिंह धोनीच्या नव्या पोस्टने सर्व चाहते संभ्रमात पडले आहेत. धोनीने पोस्टमध्ये नवीन भुमिका असे शब्दप्रोयग करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामुळे आयपीएलच्या 17 व्या हंगामात धोनी चाहत्यांची चांगलीच धाकधूक वाढली आहे.

धोनीने सोशल मीडियावर पोस्ट केली की, 'नवीन हंगामाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे आणि आता नव्या भुमिकेची देखील, त्यामुळे स्टे ट्युन!' धोनीच्या या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये सभ्रम निर्माण झाला. धोनीच्या पोस्टमधील नवी भुमिका या शब्दामुळे चाहत्यांनी या पोस्टवर तुफान प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने तर मी कोणत्या मोठ्या धक्क्यासाठी आता मानसिकदृष्ट्या तयार नाहीये असं म्हटलं.

आयपीएलचा 17 वा हंगाम हा 22 मार्च पासून सुरू होत आहे. हंगामातील पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात होणार आहे. धोनी अन् विराट कोहली एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवेळा आयपीएलवर नाव कोरलं आहे. मात्र तो सध्या कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळत नाहीये. तो शेवटचा गेल्या आयपीएल हंगामात खेळला होता.

शुक्रवारी धोनी अन् त्याची पत्नी साक्षी मलिक जामनगरमध्ये दिसले होते. ते अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थिती दर्शवण्यासाठी आले होते.

(Latest Marathi Cricket News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT