MS Dhoni Rare Scooped Shot Video LSG vs CSK
MS Dhoni Rare Scooped Shot Video LSG vs CSK  esakal
IPL

MS Dhoni LSG vs CSK : 42 वर्षाच्या धोनीनं विराटसमोर ठेवला आदर्श; लखनौविरूद्धच्या सामन्यात सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Rare Scooped Shot Video LSG vs CSK : चेन्नई सुपर किंग्जचा थला महेंद्रसिंह धोनी यंदा आयपीएल हंगाम हा शेवटचा हंगाम असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच धोनीची टीम सीएसके कोणत्या मैदानावर जाते तेथे पिळवे वादळ धोनीचे शेवटचे दर्शन करण्यासाठी पोहचते.

जरी धोनीचा हा शेवटचा हंगाम आहे असं मानलं तरी त्यानं या हंगामाची वेगळ्याच लेवलवर तयारी केली आहे. कॅप्टन्सीची धुरा ऋतुराजच्या खांद्यावर दिल्यानंतर आता तो फलंदाजीत फक्त शेवटची 3-4 षटके खेळण्यासाठी येतो.

लखनौ सुपर जांयट्सविरूद्धच्या सामन्यात देखील तो 18 व्या षटकात फलंदाजीला आला. त्याने आपल्या स्टाईलनं सुरूवात केली. मात्र मोहसीन खानला त्यानं एक असा फटका मारला ज्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण धोनी असं करताना यापूर्वी कधी दिसला नव्हता.

मात्र धोनीने बदलत्या टी 20 क्रिकेटमध्ये संयुक्तिक राहण्यासाठी आपल्या गेममध्ये देखील बदल केला. त्यानं डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला ऑफ साईट येत स्कूप शॉट खेळला. ही त्यांची इनिंगमधील पहिली सिक्स होती. या सिक्सची चर्चा बराच काळ राहणार आहे.

धोनीने वयाच्या 42 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाली असताना कारकिर्दीच्या उतरंडीवर लागल्यानंतरही आपल्या गेममध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याची वृत्ती दाखवली. हा विराट कोहलीसाठी देखील एक आदर्श ठरणार आहे.

कारण विराट कोहली देखील टी 20 क्रिकेट आपल्या ठरलेल्या स्टाईलने खेळतो. त्याला देखील आपल्या भात्यात अजून काही अतरंगी शॉट जमा होतील अन् त्याचा फायदा त्याला वेगाने धावा करण्यात मिळू शकतो.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT