MS Dhoni CSK vs DC ESAKAL
IPL

MS Dhoni : @222.22 थला अभी जिंदा हैं! धोनी आला अन् दिल्लीसाठी सामना बघता बघता अवघड झाला

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni CSK vs DC : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला ठराविक अंतराने धक्के देण्याचा प्रयत्न केला. मात्र महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजा यांनी शेवटच्या तीन षटकात तुफान फटकेबाजी करत चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकात 8 बाद 167 धावांपर्यंत पोहचवले. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धाा केल्या. धोनीने 222.22 च्या स्ट्राईक रेटने 9 चेंडूत 20 धावा चोपल्या. तर जडेजाने 16 चेंडूत 21 धावा करून त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी शेवटच्या तीन षटकात जवळपास 39 धावा करत चेन्नईला एक फायटिंग टोटल दिली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने पॉवर प्लेमध्ये 49 धावा केल्या. या दरम्यान, डेवॉन कॉन्वे 10 धावा करून बाद झाला. त्याला अक्षर पटेलने बाद केले. याचबरोबर पॉवर प्ले संपल्या संपल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड 18 चेंडूत 24 धावा करून अक्षरचीच शिकार झाला.

पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला दोन धक्के दिल्यानंतर चेन्नईचा डाव काही केल्या सावराला नाही. मोईन अली 7 तर अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 21 धावा करून बाद झाले. दिल्लीच्या फिरकीपुढे चेन्नईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

ललित यादव आणि कुलदीप यादव या दोन यादवांनी रहाणे, मोईन अलीची शिकार केल्यानंतर शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांनी चेन्नईचे शतक पार करून दिले. मात्र मिचेल मार्शने शिवम दुबेला 25 धावांवर आणि खलील अहमदने 17 चेंडूत 23 धावा करणाऱ्या अंबाती रायडूला बाद करत चेन्नईला सहवा धक्का दिला.

यंदाच्या हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा अखेरची काही षटके किंवा चेंडू खेळण्यासाठीच मैदानावर येत होता. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी आज धोनीला 17 व्या षटकातच फलंदाजीला येण्यास भाग पाडले.

धोनी आणि जडेजाने शेवटच्या तीन षटकात 38 धावांची भागीदारी रचली. अखेर जेडाजा 20 व्या षटकात 16 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. दरम्यान, धोनीनेही स्लॉग ऑव्हरमध्ये 222.22 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपत सीएसकेला 167 धावांपर्यंत पोहचवले. धोनीने 2 षटकार आणि 1 चौकार मारत 9 चेंडूत 20 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Political: सत्तेचा नवा अध्याय, की महायुती?; सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने दावा केल्याने वाढली रंगत; कोण कोणासोबत, याची उत्सुकता!

Latest Marathi News Update : टिपू सुलतानाचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील - सपकाळ

Brain Activity After Death : मृत्यूनंतर ऐकू येतात 'हे' भयानक शब्द, डॉक्टरांच्या संशोधनात थक्क करणारी माहिती समोर

नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

SCROLL FOR NEXT