MS Dhoni Injury  
IPL

MS Dhoni : 'काळजी घे थाला...', MS धोनीचा 7 सेकंदाचा Unseen Video झाला व्हायरल! चाहत्यांना कोसळलं रडू

Kiran Mahanavar

MS Dhoni Injury : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा चॅम्पियन बनले. चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करून इंडियन प्रीमियर लीग 2023 ची अंतिम फेरी जिंकली, त्यानंतर विजेत्या संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान आता कॅप्टन कूल म्हणजेच एमएस धोनीशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामुळे थालाचे चाहते भावूक झाले आहेत.

अवघ्या 7 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी एकटाच बसलेला दिसत आहे. IPL 2023 दरम्यान धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे खूप अस्वस्थ दिसत होता आणि येथे देखील तो त्याच्या गुडघ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आपल्या स्टार खेळाडूला या अवस्थेत पाहून चाहत्यांना रडू आले. चाहत्यांनी थाला धोनीला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे.

आयपीएल 2023 संपल्यानंतर सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. ते म्हणाला, होय, हे खरे आहे की धोनी डाव्या गुडघ्याच्या दुखापतीसाठी वैद्यकीय सल्ला घेतला जाईल आणि त्यानुसार निर्णय घेईल.

आयपीएलचा हंगाम संपल्याने धोनी आता गुडघ्यावर उपचार करू शकतो. विशेष म्हणजे या हंगामात अनेक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडले होते, पण दुसरीकडे धोनीने गुडघ्याला दुखत असताना डगआउटमध्ये किंवा घरी बसण्यास नकार दिला. माही सुपर किंग्जचे नेतृत्व करण्यासाठी पुढे गेला आणि फायनलमध्ये संघाला विजेतेपदाचा मुकुटही दिला.

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या आधी असे मानले जात होते की, धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल आणि त्यानंतर तो निवृत्त होईल, परंतु माहीने स्पष्ट केले आहे की तो सध्या याबद्दल विचार करत नाही. तो आयपीएलच्या पुढच्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये सीएसकेचे नेतृत्व करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT