MS Dhoni | Cricket News in Marathi 
IPL

IPL 2023: चाहत्यांसाठी वाईट बातमी! एमएस धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर?

अवघ्या काही तासांवर आलेल्या आयपीएलने भारतीय क्रिकेटचे वातावरण भारून टाकले आहे पण...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 : MS Dhoni अवघ्या काही तासांवर आलेल्या आयपीएलने भारतीय क्रिकेटचे वातावरण भारून टाकले आहे. दहाही संघांची तयारी पूर्ण झालीय अवकाश गतवेजेत्या गुजरात आणि चेन्नई संघाच्या सलामीच्या लढतीचा आहे. कर्णधार एमएस धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने CSKच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पहिल्या मॅचमध्ये खेळणाऱ्या एमएस धोनीवर सस्पेन्स निर्माण झाला आहे, मात्र टीमच्या सीईओने मोठी अपडेट देत चाहत्यांना दिलासा दिला आहे. चेन्नईतील सराव सत्रादरम्यान एमएस धोनीला डावा गुडघा दुखत होता, ज्यामुळे त्याने गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सीएसकेच्या प्रशिक्षणात भाग घेतला नाही.

पीटीआयशी बोलताना चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले, माझ्या माहितीनुसार एमएस धोनी 100 टक्के खेळणार आहे. माझ्याकडे दुसरी कोणतीही माहिती नाही. धोनी खेळला नाही, तर CSK संघ यष्टीरक्षकाची जबाबदारी डेव्हॉन कॉनवे किंवा अंबाती रायडू यांच्याकडे सोपवू शकतो कारण फ्रँचायझीकडे धोनीच्या पातळीवरचा यष्टीरक्षक नाही.

आयपीएल 2023 दरम्यान खेळाडूंना खूप प्रवास करावा लागत असल्याने, धोनी नंतर स्पर्धेत उपलब्ध होण्यासाठी खेळण्याचा धोका पत्करणार नाही. मात्र धोनीला सामने न खेळण्याची सवय नाही. पाठदुखीसह विविध आजारांनी त्रस्त असतानाही त्याने खेळणे सुरू ठेवले आहे.

गुजरात टायटन्स - हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, कोना भारत, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, प्रदीप सांगवान, आर साई किशोर, विजय शंकर, साई सुदर्शन, राशिद खान, शिवम मावी, मॅथ्यू वेड, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जोश लिटल, यश दयाल, जयंत यादव, नूर अहमद, अल्झारी जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्ज - महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांडा मगाला, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अह्या मंडल, निशांत सिंधू. राजवर्धन हंगेरगेकर, मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंग, मथिसा पाथिराना, महेश टीक्षाना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT