MI vs RR Jofra Archer esakal
IPL

MI vs RR Jofra Archer : मुंबईने इंग्लंडच्या दुसऱ्या गोलंदाजाला केले पाचारण, जोफ्रा आर्चरचा पत्ता कट?

अनिरुद्ध संकपाळ

MI vs RR Jofra Archer : आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. मुंबईला प्ले ऑफसाठी आपले आव्हान कायम राखायचे असेल तर इथून पुढचे सामने जिंकणे गरजेचे आहे. याचदरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघात मोठी खळबळ माजली आहे. बातमी आली आहे की मुंबई इंडियन्स संघात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनची एन्ट्री झाली आहे. तो या लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्याची बेस प्राईस 2 कोटी इतकी होती.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जॉर्डनची मुंबई इंडियन्सच्या संघात रिप्लेसमेंट म्हणून एन्ट्री झाली आहे. मात्र तो कोणाची रिप्लेसमेंट आहे हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. सर्वजण अंदाज वर्तवत आहेत की मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागीच जॉर्डनची वर्णी लागली आहे.

जॉर्डनला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. तो रॉयल चॅलेंजर बेंगलोर, सनराईजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याकडून आयपीएल खेळला आहे. 34 वर्षाच्या जॉर्डनने 28 डावात 30.85 च्या सरासरीने 27 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपला शेवटचा आयपीएल सामना 2022 मध्ये चेन्नईसाठी खेळला होता. मुंबई इंडियन्स आपल्या दमदार गोलंदाजांविनाच या हंगामात खेळत आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर झाय रिचर्डसन देखील दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

आर्चर बेल्जियममधून परतला

जोफ्रा आर्चर नुकताच बेल्जियममधून परत आला आहे. आर्चर एल्बो स्पेशलिस्टकडे आपल्या दुखापतीची तपासणी करण्याासाठी बेल्जियमला गेला होता. तो बऱ्याच दिवसापासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. या हंगामात त्याने पुनरागमन केले मात्र आतापर्यंत तो फक्त 2 सामनेच खेळू शकला आहे. यात त्याला 1 विकेट घेता आली. रिचर्डसनच्या जागी रिले मेरेडिथला संघात स्थान मिळाले आहे. मग आता जॉर्डन कोणाच्या जागेवर संघात आला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT