Mumbai Indians IPL 2024 Kwena Maphaka  esakal
IPL

Mumbai Indians IPL 2024 : मुंबईने गळाला लावला 17 वर्षाचा वेगवान गोलंदाज? गाजवला होता 19 वर्षाखालील वर्ल्डकप

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians IPL 2024 Kwena Maphaka : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाने सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. हा माफका हा आयपीएलमध्ये दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2024 च्या हंगामासाठी साईन केलं आहे अशी माहिती मिळत आहे.

माफाकानेने 19 वर्षाखालील स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याला अजून मुंबईच्या संघात सामील केलेलं नाही. मुंबईने याबाबत अजून अधिकृत माहिती दिलेली नाही.

17 वर्षाच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने त्याच्या भन्नाट यॉर्करने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. तो काही दिवसातच वरिष्ठ संघात सामील होईल असंही बोललं जात आहे. माफाका हा 19 वर्षाखालील वर्ल्डकपचा मालिकावीर होता.

याचबरोबर त्याने क्रिकेट साऊथ आफ्रिका टी 20 चॅलेंज स्पर्धेत तीन सामन्यात सहभाग घेतला होता. टाईम्स लाईव्हने दिलेल्या माहितीनुसार रबाडा हा केजीआर स्पोर्ट्स एजन्सीद्वारे माफाकाचे प्रतिनिधित्व करतो. त्याला मुंबई इंडियन्सकडून माफाकाविषयी विचारणा झाली होती.

मुंबई इंडियन्सकडून त्याच्याशी आयपीएल करार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स माफाकाच्या अभ्यासावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या अभ्यासाची वेगळी सोय देखील करणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT