Mumbai Indians Playing 11  esakal
IPL

Mumbai Indians Playing 11 : जोफ्रा आर्चर खेळणार मग अर्जुन तेंडुलकरचा पत्ता कट होणार?

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians Playing 11 : सालाबाद प्रमाणे मुंबई इंडियन्सने आयपीएल हंगामाची आपली सुरूवात पराभवाने केली. सलग दोन पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने जोरदार मुसंडी मारत गुणतालिकेत सहावे स्थान गाठले आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद या तीन संघाचा सलग पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली होती.

गेल्या काही सामन्यात रोहित शर्मा, इशान किशन, टीम डेव्हिड आणि कॅमरून ग्रीन यांनी चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात योगदान दिले. मात्र मुंबईसाठी मधल्या फळीतील एक फलंदाज डोकेदुखी ठरत आहे. भारताचा 360 प्लेअर म्हणून ओळख असलेल्या सूर्यकुमार यादव एक खेळीचा अपवाद वगळता फारशी चमक दाखवू शकलेला नाही.

गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्स गेल्या काही सामन्यात त्यांचे मुख्य अस्त्र जोफ्रा आर्चरविनाच खेळत आहे. यंदाच्या हंगामात मुंबईचा पहिला सामना आरसीबी बरोबर झाला. या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळला होता. त्यानंतर मुंबईने तो दुखापतग्रस्त होऊ नये म्हणून विश्रांती दिली आहे. आजच्या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जर तो आजच्या सामन्यात खेळला तर तो कोणाच्या जागी संघात येईल. हाही प्रश्नच आहे. कारण अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरनडॉर्फ दोघेही चांगली गोलंदाजी करत आहेत.

पहिला सामना वगळला तर इतर सामन्यात मुंबईकडून उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज खेळलेला नाही. जोफ्रा आर्चर सध्या संघासोबत सराव करत आहे. मात्र तो अजून झोकून देऊन सराव करत नाहीये. युवा अर्जुन तेंडुलकरने आपल्या आयपीएलची सुरूवात प्रभावीपणे केली आहे. त्याने हैदराबादविरूद्धच्या सामन्यात 20 धावांची गरज असताना शेवटचे षटक प्रभावीपणे टाकले. यामुळे त्याचे मनोबल वाढले असेल.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, नेहाल वधेरा, ऋतिक शौकीन, पियुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : वाल्मिक कराड याच्या जामिनावरील सुनावणी तहकुब

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT