mumbai indians playoffs qualification scenario-ipl-2023
mumbai indians playoffs qualification scenario-ipl-2023  
IPL

IPL 2023 MI Playoffs Scenario : रोहितच्या मुंबई इंडियन्सचा पाय खोलात! प्लेऑफसाठी हा एकमेव मार्ग

Kiran Mahanavar

IPL 2023 Playoffs Scenario : आयपीएल 2023 मध्ये प्रत्येक सामन्यासह प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस रोमांचक होत आहे. गुजरात टायटन्सच्या रूपाने एक संघ प्लेऑफसाठी बुक झाला आहे. मात्र अद्याप तीन जागा शिल्लक आहेत. या तीन जागांसाठी 6 संघांमध्ये लढत होत आहे. काही संघांचे टॉप-4 मध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, तर काही संघांचे पेच अजूनही अडकले आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या 13 सामन्यांतून 14 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ आपल्या पुढच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. जर मुंबई संघाने हा सामना जिंकला तर त्याचे 16 गुण होतील. पण मुंबईसाठी समस्या त्यांच्या नेट रनरेटची आहे.

सध्या कर्णधार रोहित शर्माच्या संघाचा धावगती -0.128 आहे. अशा स्थितीत मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. मुंबईला त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.

यावेळी मुंबईला सर्वात मोठा धोका आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्सच्या संघाकडून आहे. RCB चे देखील मुंबई सारखेच 14 गुण आहेत, परंतु त्यांचा सध्याचा धावगती +0.180 आहे. आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर आहे. पुढील सामन्यात आरसीबीने गुजरातला हरवले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचणार हे निश्चित आहे.

दुसरीकडे, जर आपण लखनौबद्दल बोललो तर त्यांचे 13 सामन्यांत 15 गुण आहेत आणि ते तिसऱ्या स्थानावर आहेत. केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात लखनौचा पराभव झाला तर मुंबईसाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे सोपे होईल. अशा स्थितीत मुंबईला त्यांच्या विजयासोबतच या दोन्ही संघांच्या पराभवाचाही आधार लागणार आहे.

त्याचवेळी राजस्थान आणि केकेआरचे संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. राजस्थानचे 14 गुण आहेत. त्याचवेळी केकेआरचे 12 गुण आहेत आणि त्यांचा एक सामना बाकी आहे. या दोन्ही संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची क्षमता इतर संघांच्या पराभवावर पूर्णपणे अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT