Natasa Stankovic-Hardik Pandya Sakal
IPL

Hardik Pandya Divorce: कोणीतरी रस्त्यावर येणार...! नताशाच्या क्रिप्टिक इन्स्टाग्राम स्टोरीने वाढवला सस्पेन्स

Natasa Stankovic-Hardik Pandya: हार्दिक पांड्या - नताशा स्टॅन्कोविच यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अशातच नताशाच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने आणखीनच सस्पेन्स वाढवला आहे.

Pranali Kodre

Natasa Stankovic-Hardik Pandya: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविच त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच मतभेद असल्याचे समोर आले असून आता त्यांच्यात घटस्फोट होण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. अशातच नताशाने शनिवारी इन्स्टाग्राम स्टोरीवरीवर केलेल्या पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नताशाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरी बायोमधील पांड्या हे आडनाव हटवले असल्याचेही म्हटले जात आहे. त्यानंतर हार्दिक आणि तिच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना वाव मिळाला.

यातच आता अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिकच्या प्रॉपर्टीमधील 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागणार असल्याचेही म्हटलं जात आहे. मात्र यातील कोणत्याच गोष्टीची अद्याप पुष्टी झालेली नाही.

त्यातच आता नताशाने वाहतूक नियमांचे चिन्ह असलेले एक पोस्टरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून त्यावर तिने कॅप्शन लिहिले आहे की 'कोणीतरी आता रस्त्यावर येणार आहे.'

आधीच घटस्फोटाच्या आणि पोटगीच्या चर्चा रंगल्या असतानाच तिच्या या स्टोरीने आता पुन्हा सस्पेन्स वाढवला आहे. तिने ही स्टोरी का टाकली असावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Natasa Stankovic Instagram Story

नताशा-हार्दिकला एक मुलगा

नताशा आणि हार्दिक यांनी जानेवारी 2020 मध्ये साखरपूडा केला होता. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे म्हटले जाते. दरम्यान, या जोडप्याला जुलै 2020 मध्ये पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव आगस्त्य ठेवलं आहे.

तसेच मुलाच्या जन्मानंतर जवळपास अडीच वर्षांनी त्यांनी कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने उदयपूरमध्ये भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT