IPL

KKR vs RR : नितीश राणा चमकला; केकेआरने पराभवाची मालिका केली खंडीत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अखेर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आपली पाच पराभवांची मालिका खंडित करत विजयाची चव चाखली. केकेआरने राजस्थानचे 153 धावांचे आव्हान 19.1 षटकात 3 फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. केकेआरकडून नितीश राणाने (Nitish Rana) नाबाद 48 तर रिंकू सिंहने नाबाद 42 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने देखील 34 धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने कर्णधार संजू सॅमसनच्या 54 धावांच्या जोरावर 152 धावा केल्या होत्या. (Nitish Rana Shine Kolkata Knight Riders Defeat Rajasthan Royals IPL 2022)

राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात खराब झाली. कुलदीप सेनने अॅरोन फिंचला 4 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. तर प्रसिद्ध कृष्णाने नवा सलामीवीर बाबा अपराजितला 15 धावांवर बाद करत 32 धावांवर दुसरा धक्का दिला.

या दोन धक्क्यातून केकेआरला कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांच्या तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीने सावरले. मात्र ही भागीदारी बोल्टने संपवली. त्याने कर्णधार श्रेयस अय्यरला 34 धावांवर बाद केले. त्यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंह यांनी राजस्थानला यश मिळू दिले नाही. या दोघांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. अखेर कोलकाताने सामना 7 गडी राखून जिंकला. नितीश राणाने नाबाद 48 तर रिंकू सिंहने नाबाद 42 धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला उमेश यादवने पहिला धक्का दिला. त्याने देवदत्त पडिक्कलला पडिक्कलला अवघ्या 2 धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि जॉस बटलरने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

मात्र ही भागीदारी 48 धावांपर्यंत पोहचवली असतानाच टीम साऊदीने ही जोडी फोडली. त्याने जॉस बटलरला 22 धावांवर बाद केले. डॅलेर मिचेलच्या जागी संधी मिळालेल्या करूण नायरने निराशा केली. तो 13 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. त्याला अनुकूल रायने बाद केले.

दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराना विकेट पडत असताना कर्णधार संजू सॅमसनने झुंजार अर्धशतकी खेळी करत राजस्थानला शंभरी पार करून दिली. दरम्यान दुसऱ्या बाजूने विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच राहिला. टीम साऊदीने रियान परागला 19 धावांवर बाद करत राजस्थानला चौथा धक्का दिला.

17 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रियान पराग बाद झाला. त्यानंतर 49 चेंडूत 54 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी करणारा संजू सॅमसनला शिवम मावीने बाद केले. यामुळे राजस्थानच्या धावगतीला ब्रेक लागला. अखेर शेवटच्या दोन षटकात शिमरॉन हेटमायरने फटकेबाजी करत संघाला 152 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. केकेआरकडून साऊदीने 2 तर उमेश, अनुकूल आणि मावीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT