Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore esakal
IPL

Philip Salt DC vs RCB : दुधात मिठाचा खडा! आरसीबीला दिल्लीच्या एकट्या फिल्प सॉल्टने धुतले

अनिरुद्ध संकपाळ

Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा दिल्ली कॅपिटल्सने 7 विकेट्स राखून पराभव केला. दिल्लीने आरसीबीचे 182 धावांचे आव्हान 17 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात आरामात पार केले. दिल्लीकडून फिल्प सॉल्टने 87 धावांची दमदार खेळी करत एकहाती सामना जिंकून दिला. त्याला रिले रूसोने नाबाद 35 धावा करत चांगली साथ दिली.

आरसीबीने ठेवलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपटिल्सने दमदार सुरूवात केली. सलामीवीर फिल्प सॉल्ट आणि डेव्हिड वॉर्नर यांना 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर वॉर्नर 22 धावा करून बाद झाला. वॉर्नरनंतर आक्रमक खेळणाऱ्या सॉल्टला मिचेल मार्शने 26 धावा करून साथ दिली. दोघांनी दिल्लीला 10 षटकात 119 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, सॉल्टने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

मात्र ही अर्धशतकी भागीदारी हर्षल पटेलने फोडली. त्यानंतर आलेला रिले रूसोने सॉल्टकडे डावाची सर्व सूत्रे सोपवत त्याला दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत साथ दिली. सॉल्टने जवळपास 190 च्या स्ट्राईक रेटने धावा दिल्लीला 15 षटकात 166 धावांपर्यंत पोहचवले. आता सामना 30 चेंडूत फक्त 16 धावा असा आला.

दरम्यान, 16 व्या षटकात शतकाच्या जवळ पोहचलेला फिल्प सॉल्ट 45 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. त्याला कर्ण शर्माने बाद केले. यानंतर अक्षर पटेल आणि रिले रूसोने दिल्लीच्या विजयाची औपचारिकता 17 व्या षटकात पार केली. रूसोने 21 चेंडूत 35 धावा केल्या. तर अक्षरने 3 चेंडूत नाबाद 8 धावा केल्या.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 181 धावा ठोकल्या. विराट कोहलीने 55 तर महिपाल लोमरोरने 54 धावा केल्या. फाफ ड्युप्लेसिसनेही 45 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT