Rajvardhan Hangarekar Emotional After CSK Brought Him esakal
IPL

CSKने बोली लावताच राजवर्धन झाला भावूक; संघाशी वडिलांचे होते खास रिलेशन!

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल मेगा लिलावात (IPL 2022 Auction) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आपला जुना संघ पुन्हा बांधण्याची रणनीती अवलंबली होती. मात्र याचबरोबर चेन्नईने काही युवा खेळाडूंनाही आपल्या संघात स्थान देत भविष्याचा विचार देखील केला. चेन्नईच्या युवा ब्रिगेडमध्ये यंदाच्या U19 वर्ल्डकप विजेत्या संघातील अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangarekar) याचा देखील समावेश आहे. सीएसकेने त्याला 1.5 कोटी रूपये खर्चून आपल्या संघात सामावून घेतले आहे. राजवर्धनला किती कोटी मिळाले यापेक्षाही तो आता भारतालाच नाही तर जगातला सर्वात शार्प क्रिकेटिंग माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या छत्रछायेखाली वाढणार आहे हे जास्त महत्वाचे आहे. (Rajvardhan Hangarekar emotional after CSK brought him)

ज्यावेळी लिलावात राजवर्धन हंगरगेकरला चेन्नईने 1.5 कोटी रूपयांना खरेदी केले त्यावेळी हंगरगेकर काहीसा भावूक झाला. त्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'सीएसके ही माझ्या वडिलांची सर्वात आवडती टीम होती. ते सीएसकेला वेड्यासारखे फॉलो करायचे. ते आजचा दिवस पहायला जिवंत असायला हवे होते. मात्र आता ते जेथे कोठे असतील ते नक्कीच खूप आनंदी असतील. माझ्याकडे खरंच शब्द नाहीत.' राजवर्धन हे सांगत असताना त्याचा कंठ दाटून आला होता. दोन वर्षापूर्वी राजवर्धनच्या वडिलांचा (Rajvardhan Hangarekar Father) कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

U19 वर्ल्डकप विजेत्या दुसरा अष्टपैलू खेळाडू राज बावा (Raj Bawa) याला देखील पंजाब किंग्जने (Punjab Kings) 2 कोटी रूपये बोली लावत आपल्या संघात घेतले. तो आता दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कसिगो रबाडाच्या सानिध्यात राहणार आहे. याबाबत राज खूपच उत्साही आहे. तो म्हणाला की रबाडाकडून चार कानगोष्टी शिकण्यासाठी तो आतूर आहे. दुसरीकडे त्याचे वडील सुखविंदर बावा म्हणाले की, 'राजला पंजाब किंग्जचे प्रशिक्षक अनिल कुंबळेकडून (Anil Kumble) भरपूर काही शिकायला मिळेल. शिकण्याच्या काळात त्याला चांगल्या व्यक्तीचा सहवास लाभणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT