GT Give RR Its Season First Defeat
GT Give RR Its Season First Defeat  esakal
IPL

RR vs GT : राशिद अन् राहुल! दोन RR अन् 2 षटकात बाजी पलटली, सामन्याचा हिरोच ठरला व्हिलन?

अनिरुद्ध संकपाळ

Rashid Khan Rahul Tewatia Pull Match In Last 2 Overs GT Give RR Its Season First Defeat : राजस्थान विरूद्ध गुजरात सामन्यात कुलदीप सेनचं सगळं कसं गोड गोड सुरू होतं. पठ्ठ्यानं तीन षटकात 21 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या होत्या. साई किशोर, मॅथ्यू वेड अन् अभिनव मनोहर यासारख्या तगड्या फलंदाजांची शिकार केली.

मात्र स्वतःचं शेवटचं अन् संघासाठी 19 वं षटक टाकताना कुलदीपनं माती खाल्ली. त्यानं एकाच षटकात 20 धावा देत गुजरातला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. शेवटच्या 12 षटकात विजयासाठी 35 धावांची गरज असताना कुलदीपचं हे 20 धावांचं महागडं षटक गुजरातसाठी संजीवनी ठरलं.

कुलदीपनं या षटकात दोन वाईड अन् एक नो बॉल पकडून तब्बल 9 चेंडू टाकले अन् राजस्थाननं जिंकलेला सामना याच षटकात हरला. कारण या षटकात राहुल अन् राशिदला फक्त 3 चौकार मारता आले होते. कुलदीपनं 19 व्या षटकात दिवे लावल्यानंतर 20 व्या षटकात आवेश खानवर दबाव वाढला होता.

त्याला शेवटच्या षटकात 15 धावा डिफेडं करता आल्या नाहीत. राशिदनं षटकाच्या सुरूवातीलाच दोन चौकार मारत आवेशचा आवेगच संपवून टाकला होता. त्यानंतर 2 चेंडूत 4 धावांची गरज असताना राहुल तीसरी धाव घेताना धावबाद झाला. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरणार असं वाटत असतानाच राशिदनं एका चेंडूत 2 धावांची गरज असताना चौकार मारत राजस्थानला त्यांचा हंगामातील पहिला पराभव गिफ्ट केला.

राजस्थानच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर संजू सॅमसन आणि रियान पराग यांची यंदाच्या हंगामात चांगलीच गट्टी जमल्यांच दिसून आलं. आजच्या सामन्यात देखील राजस्थानने पॉवर प्लेमध्ये आपले दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतरही संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची खणखणीत भागीदारी रचली.

रियान परागनं 76 धावांची खेळी केली तर संजू 38 चेंडूत 68 धावा करून नाबाद राहिला. त्यानंतर हेटमारयनं 5 चेंडूत 13 धावा ठोकत राजस्थानला 196 धावांपर्यंत पोहचवलं. राजस्थानची शेवटच्या 10 षटकातील फलंदाजी पाहता त्यांनी सामन्यावर पकड निर्माण केली असं वाटलं.

मात्र पॉवर प्लेमधील थोडा संथ खेळ यामुळे राजस्थान काही 200 च्या पार जाऊ शकली नाही. इथंच राजस्थाननं गुजरातला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी बहाल केली होती. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं या संधीचं सोनं केलं. त्यानं 44 चेंडूत 72 धावांची खेळी करत संघाला जिंकण्याच्या स्थितीत आणून ठेवलं.

गिलनं आर. अश्विन अन् युझवेंद्र चहल या दोन कसलेल्या गोलंदाजांविरूद्ध हल्ला चढवत चौकार अन् षटकारांनी धावा वसूल केल्या. यामुळं तो 16 व्या षटकात जरी बाद झाला असला तरी पुढं राहुल तेवतिया अन् राशिद खानचं काम त्यानं सोपं करून ठेवलं होतं. कूल राहुल अन् घातकी राशिदनं शेवटच्या दोन षटकात कर्णधाराने घालून दिलेल्या पायावर विजयी कळस चढवला. गुजरातनं दिलेल्या पराभवानं जरी राजस्थानचं अव्वल स्थान डळमळीत झालं नसलं तरी त्यांच्या विजयी घोडदौडीला गालबोट मात्र नक्की लागलं!

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT