Dinesh Karthik Virat Kohli RCB Fan Trolled esakal
IPL

VIDEO: RCB फॅन कार्तिकला 'टॉपर' तर कोहलीला 'बॅक बेंचर' का म्हणत आहेत?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोरमध्ये (Royal Challengers Bangalore) पहिल्यापासूनच स्टार खेळाडूंचा भरणा असतो. यंदाच्या हंगामात देखील विराट कोहली (Virat Kohli) , फाफ ड्युप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांचा संघात समावेश आहे. आरसीबीची स्ट्राँग बॅटिंग लाईन अप कायमच प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवते. राजस्थान रॉयल्स बरोबर झालेल्या सामन्यात देखील आरसीबीच्या तगड्या बॅटिंग लाईन अपने राजस्थानच्या मुठीत असलेला विजय खेचून आणला. या सामन्यात दिनेश कार्तिकने 44 धावांची मॅच विनिंग खेळी केली. या अटीतटीच्या सामन्यातील विजयानंतर आरसीबीने आपल्या ड्रेसिंग रूममध्ये याचे दमदार सेलिब्रेशन केले.

आरसीबीच्या ड्रेसिंग रूममधील या व्हिडिओत सामन्याचा हिरो ठरलेला दिनेश कार्तिक गुणी बाळासारखा मी कशी परीक्षेच्या कठिण प्रश्नाची तयारी केली हे सांगत होता. त्याच फ्रेममध्ये विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिस देखील दिसत आहेत. हे दोघे दंगा मस्ती करताना दिसत होते. विराट काही डान्सच्या मूव्ह करत होता. त्याला ड्युप्लेसिस साथ देत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका चाहत्याने तर दिनेश कार्तिकला वर्गातील टॉपर विद्यार्थी (Topper Student) असे संबोधले तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीला वर्गातील बॅक बेंचर (Back Benchers) म्हणून संबोधले.

आरसीबीने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात 170 धावांचे टार्गेट पार केले. दिनेश कार्तिकने मॅच फिनिशरची भुमिका चोख बजावली. त्याने 23 चेंडूत 44 धावांची खेळी केली. त्यात त्याने 7 चौकार आणि एक 6 मारली. आरसीबीने आपला हंगामातील पिहला सामना गमावला होता. मात्र त्यानंतर आरसीबीने पाठोपाठ दोन मॅच जिंकून आपली विजयी घोडदौड सुरू केली. बेंगलोर सध्या गुणतालिकेत 4 गुण आणि +0.159 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर पोहचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT